कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला

मोजक्या खेळाडूंना बीसीसीआयने झुकते माप दिले होते. ज्यात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहलीचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 07:07 PM2024-09-25T19:07:07+5:302024-09-25T19:08:46+5:30

whatsapp join usJoin us
Why Special treatment For Virat Kohli And Rohit Sharma Sanjay Manjrekar warns BCCI | कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला

कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Why Special treatment For Virat Kohli And Rohit Sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या पदरी बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी अपयश पदरी पडले. भारतीय संघाने हा सामना २८० धावांनी जिंकला. पण दोन स्टार खेळाडूंच्या फ्लॉपमुळं एक कळीचा मुद्दा चर्चेत आला आहे. 

माजी क्रिकेटरनं बीसीसीआयसह अजित आगरकरवर साधला निशाणा

भारताचा माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर याने या स्टार खेळाडूंसदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. अन्य खेळाडूंच्या तुलनेत या दोघांना बीसीसीआयकडून जी स्पेशल ट्रीटमेंट मिळाली. ते बरोबर नाही, असे मांजरेकरांनी म्हटले आहे. संजय माजरेकर याने थेट  बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

विराट अन् रोहित देशांतर्गत क्रिकेटपासून राहिले होते दूर 

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला देण्यात आला. दुलिप करंडक स्पर्धेत त्याची झलकही पाहायला मिळाली. भारतीय संघातील अनेक चेहरे या स्पर्धेत खेळताना दिसले. यात मोजक्या खेळाडूंना मात्र बीसीसीआयने झुकते माप दिले होते. ज्यात कर्णधार रोहित शर्मासहविराट कोहलीचा समावेश होता. त्यांना दिलेली ही मोकळीक संजय मांजरेकरला खटकली आहे. बांगलादेश विरुद्धच्या दोघांच्या फ्लॉप शोचा दाखला देत त्याने थेट बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. दोघांना स्पेशल ट्रीटमेंट का?  हे काही चांगले लक्षण नाही, असे त्याने म्हटले आहे. 

हा निर्णय ना त्यांच्यासाठी भल्याचा होता ना संघासाठी

संजय मांजरेकरने ईएसपीएनक्रिकइन्फोवरील खास मुलाखतीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा दुलिप करंडक स्पर्धेत खेळले असते तर चित्र वेगळे दिसले असते, असे म्हटले आहे. काही खेळाडूंना स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रकार खेळाडूंसह भारतीय क्रिकेटचं नुकसान करणारा आहे, अशा शब्दांत त्यांनी बीसीसीआय निवड समितीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. दुलिप करंडक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय ना त्या  खेळाडूंसाठी हिताचा वाटतो ना संघासाठी, असा उल्लेखही त्यांनी केला. या दोन्ही खेळाडूंमध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे, ते पुन्हा ती गोष्ट साध्य करून दाखवतील. पण  बीसीसीआयने काही खेळाडूंना स्पेशल ट्रीटमेंट देण्यासंदर्भातील गोष्टीबद्दल पुन्हा विचार करायला हवा.  
  
 

Web Title: Why Special treatment For Virat Kohli And Rohit Sharma Sanjay Manjrekar warns BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.