अजिंक्य रहाणे, आपल्या तंत्रशुद्ध खेळीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा फलंदाज म्हणून ओखळला जातो. तो कदाचित रोहित सारखा हिटर नाही, विराट सारखा रन मशिन नाही, रौना, धोनी, गेल यांच्यासारखा मैदानाच्या बाहेर फटके मारण्यासाठीही तोप्रसिद्ध नाही. पण त्याने आयपीएलमध्ये केलेल्या धावांची आकडेवारी निश्चीतच सरस आहे. त्याला दिल्लीच्या संघात आणण्यासाठी दिल्लीचे त्या वेळचे मेंटॉर सौरव गांगुली कारणीभूत होते. राहूल तेवतिया आणि मयांक मार्कंडेय यांच्या बदल्यात ट्रेड ऑफच्या माध्यमातून रहाणेला दिल्लीच्या संघात स्थान मिळाले.
रहाणेवर तसा टेस्ट स्पेशलिस्टचा शिक्का बसला आहे. पण आयपीएलमधील त्याची कामगिरी खुप काही सांगून जाते. या सीझनच्या सुरूवातीला तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अकराव्या स्थानी होता. आता नुकतेच वॉटसनने त्याला मागे टाकले आहे. आता रिषभ पंत संघात नसताना रहाणेला संधी मिळाल्या देखील. मात्र त्यात त्याला फार काही करता आले नाही. पंत फिट झाल्यावर पुन्हा रहाणे बाकावर जाऊन बसला. २०१० चे सत्र वगळता रहाणे आतापर्यंत सर्व सत्रात खेळला आहे. राजस्थान रॉयल्सचा तर तो काही काळ कर्णधार देखील होता. रहाणे सुरूवातीला मुंबईच्या संघात होता. मात्र तेथे त्याला अंतिम ११ मध्ये फार संधी मिळाल्या नाहीत. मग राजस्थानने त्याला संघात स्थान दिले.
द्रविड बरोबरीने त्याने सुरूवात केली. २०१५ पर्यंत तो संघाचा भाग होता. २०१६ आणि २०१७ च्या सत्रात राजस्थावरच बंदी असल्याने रहाणे पुणे सुपर जायंट्स कडून खेळला. तेथेही तो सलामीलाच येत होता. नंतर २०१८ ला राजस्थानने त्याला राईट टू मॅचचे कार्ड वापरून आपल्यात ताफ्यात सामील करून घेतले. मग गेल्या वर्षीच ट्रेड आॅफच्या माध्यमातून तो दिल्ली संघात आला. अद्याप आयपीएल विजेत्या महेंद्र सिंह धोनी आणि गौतम गंभीर यांना न जमलेले टी २० शतक करण्याची कामगिरी त्याने दोन वेळा केली आहे.
दिल्लीची नेमकी अडचण आहे की, त्यांच्याकडे युवा आणि फटकेबाजी करणाºया खेळाडूंची संख्या कमी नाही. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी प्रत्येक सामन्यात शानदार सुरूवात करून दिली आहे. मधल्या फळीत अय्यर, रिषभ पंत, हेटमायर या सारखे तगडी फटकेबाजी करणारे युवा आहेत. त्यात रहाणेला संघात संधी कमी आहेत. असे असले तरी त्याला यंदाच्या मिड सिझन ट्रान्सफरला दिल्लीने सोडले नाही.
अजिंक्य रहाणेसामने १४३धावा ३८४५शतके २अर्धशतके २७
राजस्थानला हा सौदा परवडला का-
रहाणेला संधी न देताही दिल्लीचा संघ हा गुणतक्त्यात आघाडीवर आहे. मात्र त्या बदल्यात राजस्थानला मिळालेला राहुल तेवतिया या सत्रात स्टार ठरला. त्याने शेल्डन कॉट्रेलला मारलेले पाच षटकार कोण विसरु शकेल. त्याने या सत्रात आपला शानदार फटकेबाी आणि उत्तम गोलंदाजीने काही सामने हे राजस्थानच्या बाजुने झुकवले आहेत. तर मयांक मार्कंडेय मात्र बेंचवरच बसुन आहे.
राहुल तेवतिया १० सामने २२२ धावागोलंदाजी - १० सामने ७ बळीया सत्रातील कामगिरीअजिंक्य रहाणे३ सामने २५ धावा