West Indies vs England 2nd Test Draw : वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( captain Kraigg Brathwaite ) याने पुन्हा एकदा तो कसोटी क्रिकेटमधील नवीन 'Wall' आहे हे सिद्ध केले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ९ बाद ५०७ धावांच्या प्रत्युत्तरात ब्रेथवेटने ४८९ चेंडूंचा सामना करताना १७ चौकारांसह १६० धावा केल्या. तो जवळपास ७१० मिनिटं इंग्लंडसमोर शड्डू ठोकून उभा राहिला.
त्यानंतर इंग्लंडने दुसरा डाव ६ बाद १८५ धावांवर घोषित करून वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य ठेवले. पुन्हा एकदा इंग्लंडच्या मार्गात ब्रेथवेटने मजबूत भिंत उभी केली. यावेळी तो १८४ चेंडू, २४५ मिनिटे इंग्लंडच्या गोलंदाजांशी भिडला अन् नाबाद ५६ धावा करून कसोटी अनिर्णीत सोडवली. विंडीजने दुसऱ्या डावात ५ बाद १३५ धावा केल्या.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचे पाच फलंदाज ९३ धावांवर माघारी परतले होते, परंतु ब्रेथवेट खेळपट्टीवर उभा राहिला. त्याला जोशुआ डी सिल्वाने नाबाद ३० धावा करून दमदार साथ दिली. ११ वर्षात प्रथमच ब्रिजटाऊनच्या या खेळपट्टीवर कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णीत लागला. २०११मध्ये पावसामुळे वेस्ट इंडिज-भारत कसोटी अनिर्णीत राहिली होती. क्रेग ब्रेथवेटने या खेळीसह १८ वर्षांपूर्वीचा ब्रायन लारा याचा विक्रम मोडला.
क्रेग ब्रेथवेटने या सामन्यात ६७३ चेंडूंचा सामना केला आणि कसोटी क्रिकेटमध्ये ६००+ चेंडूंचा सामना करणारा तो विंडीजचा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी २००४ मध्या लाराने ५८२ चेंडूंचा सामना केला होता. तेव्हा त्याने गॅरी सोबर्स यांनी १९५८ साली नोंदवलेला ५७५ चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम मोडला होता.
१९७०नंतर कसोटीत सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारे फलंदाज
- ७५९ चेंडू - ग्लेन टर्नर वि. वेस्ट इंडिज, १९७२
- ७२५ चेंडू - जेफ बॉयकॉट वि. वेस्ट इंडिज, १९७४
- ७२३ चेंडू - मार्क टेलर वि. पाकिस्तान, १९९८
- ७१० चेंडू - स्टीफन फ्लेमिंग वि. श्रीलंका, २००३
- ६७३ चेंडू - गॅरी कर्ट्सन वि. इंग्लंड, १९९९
- ६७३ चेंडू - क्रेग ब्रेथवेट वि. इंग्लंड, २०२२
२१ व्या शतकात कसोटीत सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे फलंदाज
- ७१० चेंडू - स्टीफन फ्लेमिंग वि. श्रीलंका, २००३
- ६७३ चेंडू - क्रेग ब्रेथवेट वि. इंग्लंड, २०२२
- ६७० चेंडू - अँडी फ्लॉवर वि. दक्षिण आफ्रिका, २००१
- ६२६ चेंडू - कुमार संगकारा वि. बांगलादेश, २०१४
- ६१६ चेंडू - राहुल द्रविड वि. ऑस्ट्रेलिया, २००३
Web Title: WI vs ENG 2nd Test Draw : West Indies captain Kraigg Brathwaite faced an astonishing 673 deliveries in the Test, the most ever by a West Indian in a single match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.