आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ऐतिहासिक कामगिरी! Phil Salt ने ४ दिवसांत ठोकली दोन शतकं 

आयपीएलच्या लिलावाआधी आणि नंतर शतक झळकावणारा इंग्लंडचा फिल सॉल्ट ( Phil Salt ) अनसोल्ड राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 12:43 PM2023-12-20T12:43:48+5:302023-12-20T12:44:44+5:30

whatsapp join usJoin us
WI vs ENG 4th T20I : Phil Salt Created history in T20I Int'l History, Still he's not picked in IPL 2024 auction | आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ऐतिहासिक कामगिरी! Phil Salt ने ४ दिवसांत ठोकली दोन शतकं 

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ऐतिहासिक कामगिरी! Phil Salt ने ४ दिवसांत ठोकली दोन शतकं 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WI vs ENG 4th T20I   (Marathi News)  : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी काल दुबईत लिलाव पार पडला आणि त्यात पॅट कमिन्स व मिचेल स्टार्कसह अनेकांवर कोट्यवधींचा वर्षाव झालेला पाहायला मिळाला. एकूण ७२ खेळाडूंवर बोली लावली गेली आणि २३०.४५ कोटी खर्च केले गेले. पण, आयपीएलच्या लिलावाआधी आणि नंतर शतक झळकावणारा इंग्लंडचा फिल सॉल्ट ( Phil Salt ) अनसोल्ड राहिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. वेस्ट इंडिज दौऱ्यावरील सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत सॉल्टने शतक झळकावली आणि काल त्याने ऐतिहासिक कामगिरी केली.


- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त दोन शतकं झळकावणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू
- इंग्लंडकडून सलग दोन सामन्यांत शतक झळकावणारा पहिला फलंदाज
- एकाच ट्वेंटी-२० मालिकेत दोन शतकं करणारा पहिला फलंदाज 
- ४ दिवसांत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यांत दोन शतकं, मालिकेत सर्वाधिक धावा

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना काल झाला. यष्टिरक्षक-फलंदाज फिल सॉल्ट व कर्णधार जोस बटलर यांनी विंडीजच्या गोलंदाजांना झोडून काढले. दोघांनी पहिल्या ९.५ षटकांत ११७ धावांची भागीदारी केली. बटलर २९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ५५ धावांवर बाद झाला. विल जॅक्सने ९ चेंडूंत २४ धावांचा पाऊस पाडला. सॉल्टने ५७ चेंडूंत ७ चौकार व १० षटकारांसह ११९ धावांची वादळी खेळी करून संघाला २० षटकांत ३ बाद २६७ धावांचा पल्ला गाठून दिला. लिएम लिव्हिंगस्टोनने २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावा कुटल्या.


वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १५.३ षटकांत १९२ धावांत तंबूत परतला. आंद्रे रसेलने २५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. निकोलस पूरन ( ३९) व शेर्फाने रुथरफोर्ड ( ३६) यांच्या व्यतिरिक्त विंडीजच्या अन्य फलंदाजांनी निराश केले. इंग्लंडच्या रिसे टॉप्लीने ३, सॅम कुरन व रेहान अहमद यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. इंग्लंडने ७२ धावांनी हा सामना जिंकला. 

फिल सॉल्टची कारकीर्द  

  • वन डे - ६१९ धावा, ३६.४ सरासरी, १३३.४ स्ट्राईक रेट
  • ट्वेंटी-२० - ६०१ धावा, ३५.४ सरासरी, १६५.६ स्ट्राईक रेट
  • आयपीएल - २१८ धावा, २७.३ सरासरी, १६३.९ स्ट्राईक रेट 
  • विंडीजविरुद्धच्या मालिकेत २९३ धावा, ९७.७ सरासरी, १८७.८ स्ट्राईक रेट   

Web Title: WI vs ENG 4th T20I : Phil Salt Created history in T20I Int'l History, Still he's not picked in IPL 2024 auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.