Join us

ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)

वनडे क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडलं असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:50 IST

Open in App

Alzarri Joseph vs Shai Hope : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात खेळाडू एकमेकांवर राग काढतानाचा सीन अनेकदा पाहायला मिळतो. पण कधी तुम्ही आपल्याच संघाच्या  कॅप्टनसोबत भांडण करून खेळाडूनं मैदान सोडल्याचा सीन कधी पाहिला आहे का?  बहुतांशवेळा गल्ली क्रिकेटमध्ये पाहयला मिळणारा हा सीन  चक्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात दिसून आला आहे. आपल्याच संघाच्या कॅप्टनशी वाद घालत गोलंदाजाने मैदान सोडल्याचा प्रकार घडला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असं घडलं असेल. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये गल्ली क्रिकेट सीन!

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात हा प्रकार घडला. या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाचा कॅप्टन आणि यात संघाच्या ताफ्यातील स्टार गोलंदाज अल्झारी जोसेफ यांच्यात मैदानातच वाजलं. जोसेफ कॅप्टनवर एवढा नाराज झाला की रागाने त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. शाई होपनं सेट केलेल्या फिल्ड सेटच्या मुद्यावरुन हे प्रकरण तापलं अन् ते आता चांगलेच गाजताना दिसत आहे.

जोसेफला नेमका कोणत्या गोष्टीचा आला राग?  इंग्लंडच्या डावातील चौथ्या षटकात जोसेफ फिल्डिंग सेटअपच्या मुद्यावरुन नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. तो स्लिपमध्ये उभ्या असलेल्या खेळाडूला इशारे करत काही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळ हा ड्रामा सुरु होता. पण या खेळाडूनं जोसेफचं काही ऐकलं नाही.

विकेट घेतली ओव्हर संपवली अन् जोसेफनं सोडलं मैदान, मग फिल्डवर दिसले फक्त १० खेळाडू  

रागारागानं गोलंदाजी करताना या षटकातील चौथ्या चेंडूवर जोसेफनं विकेटही घेतली. पण त्याने काही या विकेट्सच सेलिब्रेशन केले नाही. ही विकेट मिळवूनही त्याचा राग शांत झाला नाही. षटक संपवल्यानंतर तो थेट मैदानात सोडून बाहेर आला. हा सीन बघून डॅरेन सॅमी हैराण झाला. एक ओव्हर वेस्ट इंडिजचे फक्त १० खेळाडूच फिल्डवर होते.

टॅग्स :वेस्ट इंडिजइंग्लंडव्हायरल फोटोज्