West Indies vs England, 2nd Test Day 4 : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाहुण्यांनी १३६ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडने पहिला डाव ९ बाद ५०७ धावांवर घोषित केल्यानंतर वेस्ट इंडिजचे फलंदाज फार कमाल दाखवणार नाहीत, असे वाटले होते. पण, विंडीजच्या फलंदाजांनी खिंड लढवली. ३ बाद १०१ अशी धावसंख्या असताना कर्णधार व सलामीवीर क्रेग ब्रेथवेट ( Kraigg Braithwaite ) व जेर्मेन ब्लॅकवूड ( Jermaine Blackwood) यांनी चौथ्या विकेटसाठी १८३ धावांची विक्रमी भागीदारी करून विंडीजला मजबूत धावसंख्या उभारून दिली. विंडीजने ४११ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडने दुसऱ्या डावात ४० धावा करून १३६ धावांची आघाडी घेतली.
कर्णधार जो रूट ( १५३), बेन स्टोक्स ( १२० ) आणि डॅन लॉरेन्स ( ९१) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडनं पहिला डाव ९ बाद ५०७ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात विंडीजचा जॉन कॅम्बेल ( ४), सामर्ह ब्रूक्स ( ३९) व एनक्रुमाह बोन्नेर ( ९) हे झटपट माघारी परतले. ब्रेथवेट व ब्लॅकवूड यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांच यशस्वी सामना केला. ब्लॅकवूड २१५ चेंडूंत ११ चौकारांसह १०२ धावांवर बाद झाला. पण, ब्रेथवेट खिंड लढवत राहिला. जोशूआ डा सिल्वा ( ३३) वगळल्यास त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. जॅक लिचने अखेर ब्रेथवेटला बाद केले. ब्रेथवेटने ४८९ चेंडूंचा सामना करताना १७ चौकारांसह १६० धावा केल्या. तो जवळपास ७१० मिनिटं इंग्लंडसमोर शड्डू ठोकून उभा राहिला.
Web Title: WI vs ENG Test : Kraigg Braithwaite's marathon innings comes to an end on 160 in 489 balls, He batted for 710 minutes, England lead by 136 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.