WI vs IND 2023 4th t20 live update in marathi : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ मैदानात आहे, तर सलग दुसरा विजय मिळवून मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हार्दिकसेना सज्ज आहे. आजचा सामना देखील भारतीय संघासाठी 'करा किंवा मरा' असाच असणार आहे.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या संघाविरूद्ध खेळून विजय मिळवण्याची ही चांगली संधी आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, असे कॅरेबियन संघाचा कर्णधार रोवमन पॉवेलने नाणेफेकीनंतर सांगितले. भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी कोणताही बदल करण्यात आला नाही. तसेच मला देखील नाणेफेक जिंकून फलंदाजी करायला आवडले असते असे भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नमूद केले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ -
रोवमन पॉवेल (कर्णधार), निकोलस पूरन, शाई होप, ब्रँडन किंग, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, कायस मेयर्स, ओडिन स्मिथ, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, ओबेड मॅकॉय.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. पण, 'करा किंवा मरा'च्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पुनरागमन करत विजयाचे खाते उघडले अन् मालिकेतील आव्हान कायम ठेवले. आज या मालिकेतील चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टुर्फ, इथे खेळवला जात आहे.
Web Title: WI vs IND 2023 4th t20 live update West Indies won the toss and elected to bat first, while Indian captain Hardik Pandya looked frustrated
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.