चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पण, दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने अप्रतिम झेल घेऊन कॅरेबियन संघाला पहिला झटका दिला. खरं तर अर्शदीपने त्याच्या दुसऱ्या षटकात देखील एक बळी पटकावला. त्यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीप यादवने निकोलस पूरनला एका धावेवर बाद केले. आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीपने भारताला मोठे यश मिळवून दिले. लक्षणीय बाब म्हणजे कुलदीपने एका षटकात २ बळी घेतले. त्याने रोवमॅन पॉवेललाही एका धावेवर बाद केले. वेस्ट इंडिजने दहा षटकांत ७९ धावांवर चार बळी गमावले.
तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला गोलंदाजी करण्यास सांगितले. भारतासारख्या बलाढ्य संघाविरूद्ध खेळून विजय मिळवण्याची ही चांगली संधी आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, असे कॅरेबियन संघाचा कर्णधार रोवमन पॉवेलने नाणेफेकीनंतर सांगितले. भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी कोणताही बदल करण्यात आला नाही. तसेच मला देखील नाणेफेक जिंकून फलंदाजी करायला आवडले असते असे भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नमूद केले. आज या मालिकेतील चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल इथे खेळवला जात आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.
आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ - रोवमन पॉवेल (कर्णधार), निकोलस पूरन, शाई होप, ब्रँडन किंग, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, कायस मेयर्स, ओडिन स्मिथ, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, ओबेड मॅकॉय.