लय भारी 'उडता संजू'...! अर्शदीपचा 'स्वॅग' सॅमसनची अप्रतिम कॅच अन् सगळेच 'शॉक'

WI vs IND 2023, 4th T20I : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 08:17 PM2023-08-12T20:17:08+5:302023-08-12T20:17:25+5:30

whatsapp join usJoin us
 WI vs IND 2023, 4th T20I Sanju Samson gives West Indies the first blow with a stunning catch of kyle mayers off Arshdeep Singh  | लय भारी 'उडता संजू'...! अर्शदीपचा 'स्वॅग' सॅमसनची अप्रतिम कॅच अन् सगळेच 'शॉक'

लय भारी 'उडता संजू'...! अर्शदीपचा 'स्वॅग' सॅमसनची अप्रतिम कॅच अन् सगळेच 'शॉक'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WI vs IND 2023 4th t20 live update in marathi :  सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा धारण केलेल्या कायल मेयर्सला बाहेरचा रस्ता दाखवण्यात अर्शदीप सिंगला यश आले. यष्टीरक्षक संजू सॅमसनने अप्रतिम झेल घेऊन वेस्ट इंडिजला पहिला झटका दिला. मेयर्स सात चेंडूत सतरा धावा करून तंबूत परतला.  अर्शदीपने सामन्याच्या दुसऱ्या आणि त्याच्या पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला. खतरनाक वाटणाऱ्या मेयर्सला बाद करून अर्शदीपने मजबूत पकड बनवण्याचा प्रयत्न केला.

तत्पुर्वी, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला गोलंदाजी करण्यास सांगितले. भारतासारख्या बलाढ्य संघाविरूद्ध खेळून विजय मिळवण्याची ही चांगली संधी आहे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, असे कॅरेबियन संघाचा कर्णधार रोवमन पॉवेलने नाणेफेकीनंतर सांगितले. भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी कोणताही बदल करण्यात आला नाही. तसेच मला देखील नाणेफेक जिंकून फलंदाजी करायला आवडले असते असे भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नमूद केले. 

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान संघाने २-० अशी आघाडी घेतली होती. पण, करा किंवा मराच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पुनरागमन करत विजयाचे खाते उघडले अन् मालिकेतील आव्हान कायम ठेवले. आज या मालिकेतील चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल इथे खेळवला जात आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ - 
रोवमन पॉवेल (कर्णधार), निकोलस पूरन, शाई होप, ब्रँडन किंग, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, कायस मेयर्स, ओडिन स्मिथ, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, ओबेड मॅकॉय. 

 

Web Title:  WI vs IND 2023, 4th T20I Sanju Samson gives West Indies the first blow with a stunning catch of kyle mayers off Arshdeep Singh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.