Join us  

भारतीय सलामीवीरांची 'यशस्वी' खेळी; गिल-जैस्वालच्या जोडीनं वेस्ट इंडिजला फोडला घाम

WI vs IND 2023, 4th T20I : आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 10:59 PM

Open in App

वेस्ट इंडिजने दिलेल्या १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी चमकदार कामगिरी केली. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी अर्धशतकी खेळी करून कॅरेबियन गोलंदाजांना घाम फोडला. जैस्वालने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये पहिले अर्धशतक झळकावले तर गिल त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला. दहा षटकांत १०० धावांची भागीदारी नोंदवून गिल-जैस्वालच्या जोडीने विजयाकडे कूच केली. 

 यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. यादरम्यान दोघांनी मिळून ११ चौकार आणि तीन षटकार मारले. यशस्वी आणि शुबमन यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथमच शतकी भागीदारी नोंदवली आहे. भारताने १० षटकांत एकही गडी न गमावता १०० धावा केल्या. अद्याप दोघेही खेळपट्टीवर टिकून आहेत. लक्षणीय बाब म्हणजे यशस्वी जैस्वाल ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये अर्धशतक झळकावणारा युवा भारतीय ठरला आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

आजच्या सामन्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ - रोवमन पॉवेल (कर्णधार), निकोलस पूरन, शाई होप, ब्रँडन किंग, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, कायस मेयर्स, ओडिन स्मिथ, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, ओबेड मॅकॉय.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशुभमन गिलयशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघ
Open in App