India Tour Of West Indies 2023 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून टीका झाली. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात मोठा विजय मिळवून भारताचा दारूण पराभव झाला. कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म टीकाकारांना आमंत्रण देत आहे. रोहित शर्माला अनेक माजी खेळाडू सल्ले देत आहेत. अशातच पाकिस्तानी संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने रोहित शर्माला काही सल्ले दिले आहेत.
भारतीय संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून यासाठी संघ जाहीर झाला आहे. बीसीसीआयने वन डे आणि कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा रोहित शर्मा दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे, तर अजिंक्य रहाणे आणि हार्दिक पांड्या हे अनुक्रमे कसोटी आणि वन डेमध्ये उप कर्णधार असतील. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला संघातून वगळण्यात आले. भारतीय संघाचे विश्लेषण करताना पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमलने मोठे वक्तव्य केले आहे.
"रोहितने विराटसारखे सक्रिय व्हावे"कामरान अकमल म्हणाला की, रोहित शर्माने आतापर्यंत भारताचा कसोटी कर्णधार म्हणून त्याच्या छोट्या कार्यकाळात चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्याला त्याचा सहकारी विराट कोहलीप्रमाणे मैदानावर थोडे अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. भारतीय संघाला चांगली सुरुवात हवी आहे. रोहित शर्माने कर्णधारपद सांभाळत चांगली कामगिरी करावी ही चाहत्यांची इच्छा आहे.
रोहितला सल्ला अकमलने रोहितला सल्ला देताना म्हटले, "रोहितने विराट कोहलीप्रमाणे मैदानावर आपली सक्रियता दाखवावी. कारण त्याला एक चांगली संधी मिळाली आहे. एक किंवा दोन खेळाडूंबाबत नेहमीच वाद होत असतो. विक्रम पाहिल्यानंतर माझ्या मनात एक खेळाडू येतो तो म्हणजे सर्फराज खान. त्याला खेळवणे शक्य नव्हते, पण त्याने संघासोबत या दौऱ्यावर जायला हवे होते. बीसीसीआय त्याला संधी देऊ शकली असती."
लक्षणीय बाब म्हणजे कामरान अकमल हा पाकिस्तानच्या अशा खेळाडूंपैकी एक आहे, ज्याला एकप्रकारे अपमान करून संघातून काढून टाकण्यात आले होते. बराच वेळ तो संघात प्रवेश मिळवण्यासाठी प्रतीक्षेत होता. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नेहमीच त्याच्याकडे कानाडोळा केला.