Irfan Pathan, IND vs WI Series : विश्रांती घेतल्याने फॉर्म परत येत नाही; विराट कोहली व रोहित शर्माला आराम दिल्याने इरफान पठाण भडकला 

Irfan Pathan, IND vs WI Series :  BCCI ने आज आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघ जाहीर केला आणि त्यात शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan) नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:33 PM2022-07-06T18:33:32+5:302022-07-06T18:34:18+5:30

whatsapp join usJoin us
WI vs IND: No one returns to form while resting, says Irfan Pathan after India rest Virat Kohli, Rohit Sharma | Irfan Pathan, IND vs WI Series : विश्रांती घेतल्याने फॉर्म परत येत नाही; विराट कोहली व रोहित शर्माला आराम दिल्याने इरफान पठाण भडकला 

Irfan Pathan, IND vs WI Series : विश्रांती घेतल्याने फॉर्म परत येत नाही; विराट कोहली व रोहित शर्माला आराम दिल्याने इरफान पठाण भडकला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Irfan Pathan, IND vs WI Series :  BCCI ने आज आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वन डे संघ जाहीर केला आणि त्यात शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan) नेतृत्व सोपवण्यात आले आहे. रवींद्र जडेजाकडे या मालिकेत उप कर्णधारपदाची जबाबदारी असेल.  विराट कोहली,  जसप्रीत बुमराह, रिषभ पंत व रोहित शर्मा यांना वन डे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. नुकताच भारतीय संघात पुनरागमन करणारा आणि आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत नेतृत्व सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्यालाही विश्रांती दिली गेली आहे. संजू सॅमसन, शुबमन गिल, अर्षदीप सिंग व आवेश खान यांना वन डे संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. 

Indian captains in 2022 : BCCI ने भारतीय संघामध्ये कर्णधारांची भरवलीय 'जत्रा'; १० महिन्यांत ८ जणांकडे सोपवलं नेतृत्व!

७ ते १७ जुलै या कालावधीत इंग्लंडविरुद्धची मालिका आहे आणि पाच दिवसांनंतर म्हणजेच २२ ते २७ जुलै या कालाधीत भारतीय संघ विंडीजविरुद्ध तीन वन डे सामने खेळणार आहे. सततच्या मालिकेमुळे निवड समितीने विराट, रोहित व जसप्रीत यांना विश्रांती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतही या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली होती. त्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या दोन ट्वेंटी-२० सामन्यातही ते खेळले नव्हते. विराट, रिषभ पंत व जसप्रीत हे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत खेळल्यामुळे त्यांना पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात विश्रांती दिली गेली आहे.

निवड समितीच्या या संघ निवडण्याच्या प्रक्रियेवर भारताचा माजी गोलंदाज इऱफान पठाण याने टीका केली आहे. विश्रांती घेतल्यानंतर कुणाचा फॉर्म परतत नाही, असे विधान त्याने केले आहे. भारताचा संघ विंडीजविरुद्ध नंतर ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यात हे सीनियर खेळाडू खेळतील अशी अपेक्षा आहे.  


 वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संघ - शिखऱ धवन ( कर्णधार), रवींद्र जडेजा ( उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्षदीप सिंग ( Team India ODI squad for West Indies series  - Shikhar Dhawan (C), Ravindra Jadeja (VC), Ruturaj Gaikwad, Shubman Gill, Deepak Hooda, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, Ishan Kishan (WK), Sanju Samson (WK), Shardul Thakur, Yuzvendra Chahal, Axar Patel, Avesh Khan, Prasidh Krishna, Mohd Siraj, Arshdeep Singh) 
 

Web Title: WI vs IND: No one returns to form while resting, says Irfan Pathan after India rest Virat Kohli, Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.