क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यात कोणता ना कोणता रेकॉर्ड प्रस्थापित झाल्याचे पाहायला मिळते. आता प्रत्येक आकडा हा काही चांगली बाब दर्शवणारा नसतो. काही रेकॉर्ड हे एखाद्या खेळाडूची किंवा त्या संघाची ताकद दाखवतात. तर काही वेळा नकोसा रेकॉर्ड संघ किंवा खेळाडूंवर नामुष्की ओढावणारा ठरतो.
एका कसोटी सामन्यात ११ खेळाडूंच्या पदरी पडला भोपळा!
वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही क्रिकेटमधील हिरोंच्या ढिसाळ कामगिरीमुळे झिरोसह नकोसा रेकॉर्ड नोंद झाला. एकाच कसोटी सामन्यात ११ खेळाडू झिरोवर आउट झाले. क्रिकेटच्या इतिहासात १४ व्या वेळी एका टेस्टमध्ये झिरोवर आउट होणाऱ्या प्लेइंग इलेव्हनच दर्शन घडलं.
कसोटी इतिहासात असं कितव्यांदा घडलं?
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एका कसोटी सामन्यात दोन्ही संघातील मिळून ११ खेळाडूंच्या पदरी भोपळा येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही असं घडलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ११ हा आकडाच याबाबतीत वर्ल्ड रेकॉर्ड ठरतोय. संयुक्तरित्या १४ सामन्यात हा सीन पाहायला मिळाला आहे. पहिल्यांदा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात ११ खेळाडू शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर १३ वेळा क्रिकेटच्या मैदानात प्लेइंग इलेव्हनचा हा आकडा पाहायला मिळाला होता.
कसोटी इतिहासातील ते सामने ज्यात पाहायला मिळाली झिरोवर आउट होणारी प्लेइंग इलेव्हन
वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका १५ ऑगस्ट २०२४
- बांगलादेश विरुद्ध श्रीलंका २३ मे २०२२
- वेस्टइंडीज विरुद्ध बांगलादेश १२ जुलै २०१८
- इंग्लंड विरुद्ध श्रीलंका २० जून २०१४
- श्रीलंका विरुद्ध वेस्टइंडीज २१ नोव्हेंबर २००१
- श्रीलंका विरुद्ध इंग्लंड १५ मार्च २००१
- वेस्टइंडीज विरुद्ध झिम्बाब्वे १६ मार्च २०००
- वेस्टइंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया ५ मार्च १९९९
- वेस्टइंडीज विरुद्ध इंग्लंड २७ फेब्रुवारी १९९८
- भारत विरुद्ध श्रीलंका २३ नोव्हेंबर १९९०
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (३० ऑगस्ट १९८८)
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड १ जानेवारी १९१४
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २ ऑक्टोबर १९६४
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड इंग्लंड ५ मार्च १९०४
वेस्ट इंडिज- दक्षिण आफ्रिका सामन्यात शेवटी काय घडलं?
गयानाच्या प्रोविडेन्स स्टेडियमवर रंगलेल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस हा गोलंदाजांनी गाजवला. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ १६० धावांत ऑल आउट झाला होता. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या वेस्ट इंडीजला पहिल्या डावात फक्त १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने १६ धावांच्या अल्प आघाडीसह सामन्यावर मजबूत पकड मिळवली. दुसऱ्या डावात २४६ धावा धावफलकावर लावत पाहुण्या संघाने यजमानांना २६३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ २२२ धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४० धावांसह सामना खिशात घातला.