नवी दिल्ली - क्रिकेटच्या मैदानात नेहमी गमतीजमती घडत असतात. भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीही अशीच गंमत घडली. या सामन्यातील चौथ्या दिवसाच्या अखेरीस जडेजाने एकाच षटकात घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारतीय संघाने लंकेला अडचणीत आणत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. यादरम्यान, शेवटच्या षटका मैदानावर घडलेल्या एका घटनेमुळे मैदानावरील पंच आणि भारतीय क्षेत्ररक्षकांना हसू आवरता आले नाही. तर टीव्हीवर थेट प्रक्षेपण पाहत असलेले प्रेक्षणही अवाक् झाले.त्याचे झाले असे की, चौथ्या दिवसातील शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना षटकातील पहिल्याच चेंडूवर जडेजाने दिमुथ करुणा रत्नेला बाद केले. त्यानंतर याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने सुरंगा लकमलला चकवले. लकमल झेलबाद असल्याचे जोरदार अपील त्याने सुरू केले. तोपर्यंत चेंडू लकमलच्या बॅटची कड घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त करून गेला होता. मात्र जडेजाचे तिकडे लक्षच नव्हते. अखेरीस पंचांनीच खूण करून फलंदाज बाद झाल्याचे जडेजाच्या लक्षात आणून दिले. पाहा व्हिडिओ
blob:http://players.brightcove.net/6933fa50-5966-4abf-a84b-956a17861653