Join us  

Video: अजब गजब कॅच! हाताला लागून चेंडू पाठीवर गेला; किपर मैदानातच झोपला अन् मग...

व्हायरल व्हिडीओ कोणत्या स्पर्धेत घडला ... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 2:04 PM

Open in App

Kerala Premier League Video: केरळ प्रीमियर लीग स्पर्धेत KPA 123 आणि KCSA कालिकत यांच्यातील सामन्यात, क्रिकेटच्या इतिहासातील तुम्ही याआधी कधीही न पाहिलेला झेल घेण्यात आला. KPA 123 च्या यष्टीरक्षकाने हा अप्रतिम आणि तितकाच नवखा अजब-गजब कॅच घेतला. KPA 123 संघाच्या यष्टिरक्षकाने झेल घेण्यासाठी करण्यासाठी उजवीकडे उडी मारली. त्याच्या ग्लोव्ह्जला चेंडू लागला आणि उडाला. एखादा टेनिसचा चेंडू उडावा तसा तो चेंडू हातून निसटला आणि पाठीच्या दिशेने गेला. यष्टिरक्षक त्यावेळी डाइव्ह मारून पोटाची बाजून जमिनीकडे असलेल्या अवस्थेत झोपला होता. तितक्यात चेंडू त्याच्या पाठीवर गेला. त्याने तो चेंडू दोन्ही हाताना कसाबसा रोखला आणि पाठीवरच त्याने तो झेल घेतला. पाहा व्हिडीओ-

हा व्हायरल क्षण तेव्हा घडला जेव्हा KPA 123 मधील डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने KSCA कालिकतच्या उजव्या हाताच्या फलंदाजाला एक सुंदर आऊटस्विंगर टाकला. त्याने बॅटने चेंडू मारायचा प्रयत्न केला होता, पण बॅटची एज लागून चेंडू यष्टिकक्षकाकडे गेला आणि त्याने झेल टिपला. टेनिस बॉल त्याच्या शरीराच्या मागील बाजूस पडला होता आणि जवळचा क्षेत्ररक्षक बॉल जमिनीवर पडू नये याची खात्री करण्यासाठी यष्टीरक्षकाने त्याचे हात चेंडूच्या बाजूला गुंडाळून ठेवले. त्यामुळेच त्याला कॅच यशस्वीरित्या पूर्ण करता आला.

टॅग्स :केरळसोशल मीडिया