Wide Ball Umpire Sanju Samson Controversy, IPL 2022 KKR vs RR : कोलकाता नाईट रायडर्स संघाला तब्बल पाच पराभवानंतर आज विजयाची चव चाखायला मिळाली. राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या बळावर १५२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मोक्याच्या क्षणी अंपायर्सच्या सुमार दर्जाच्या निर्णयप्रक्रियेमुळे कोलकाताला किमान तीन-चार वेळा वाईडच्या धावा मिळाल्या. पंचाच्या या निर्णयाची समालोचकांनी तर निंदा केलीच. पण त्यासोबत सोशल मीडियावर देखील 'हा अंपायर आहे की Shah Rukh Khan' अशा प्रकारे अंपायर्सना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.
--
--
--
--
--
--
--
--
--
वाईडचा नवा नियम काय?
प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीच्या वेळी १९व्या षटकात सामना अटीतटीच्या वळणावर होता. ११ चेंडूत १७ धावांची आवश्यकता होती. अशा वेळी प्रसिध कृष्णाने चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्यासाठी वाईडच्या दिशेने टाकले. पण फलंदाज जर स्टंपची रेष सोडून बाजूला सरकला तर तो वाईड दिला जाऊ नये असा नवा नियम आहे. तरीही किमान तीन ते चार वेळा पंचांनी त्याला वाईड दिला आणि त्यात गोलंदाजाची लय हरवली. त्याचाच फटका म्हणून शेवटच्या चेंडूवर त्याला चौकारही खावा लागला. अखेर गोलंदाजी करणाऱ्या राजस्थानच्या संघाला पराभूत व्हावे लागले.
दरम्यान, राजस्थानने प्रथम फलंदाजी केली. त्यांचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल २ धावांतच बाद झाला. लयीत असणारा जोस बटलर २५ चेंडूत २२ धावांची खेळी करून माघारी परतला. पण संजू सॅमसनने ४९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५४ धावा केल्या. तसेच अखेरच्या टप्प्यात शिमरॉन हेटमायरने २७ धावा करत संघाला १५२ धावांपर्यंत मजल मारून दिली. १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार श्रेयस अय्यरने नितीश राणाच्या सोबत चांगली भागीदारी केली होती. तो ३२ चेंडूत ३४ धावा काढून माघारी गेला. त्यानंतर नितीश राणा (नाबाद ४८) आणि रिंकू सिंग (नाबाद ४२) या जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.