Join us  

Wide Umpire Controversy Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR: वाईडच्या वादाने सामना फिरला! अखेर २६ दिवसांनी कोलकाता पुन्हा विजयी ट्रॅकवर; राजस्थानचा सलग दुसरा पराभव

नो बॉलच्या वादानंतर आता वाईडचा वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 11:27 PM

Open in App

Wide Umpire Controversy Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR Live Updates: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाला अखेर २६ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिलनंतर आज पहिला विजय मिळाला. राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनचे अर्धशतक आणि हेटमायरच्या २७ धावांच्या जोरावर १५२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अटीतटीच्या लढतीत पंचांनी किमान तीन-चार वेळा दिलेला वाईडचा निर्णय वादग्रस्त प्रकारचा ठरला. त्यामुळे कोलकाताच्या संघाला शेवटच्या षटकात एका धावेची गरज होती. तेव्हा षटकार मारून नितीश राणाने संघाला तब्बल पाच पराभवानंतर हा विजय मिळवून दिला.

--

राजस्थानने प्रथम फलंदाजी केली. त्यांचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल २ धावांतच बाद झाला. लयीत असणारा जोस बटलर २५ चेंडूत २२ धावांची खेळी करून माघारी परतला. पण संजू सॅमसनने संघाच्या आशा पल्लवित केल्या. त्याने ४९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५४ धावा केल्या. करूण नायर (१३) आणि रियान पराग (१९) हे झटपट बाद झाले. अखेरच्या टप्प्यात शिमरॉन हेटमायरने फिनिशरची भूमिका चोख बजावली. त्याने १३ चेंडूत २७ धावा केल्या. त्यात १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. कोलकाता नाईट रायडर्स कडून टीम सौदीने सर्वाधिक २ बळी टिपले.

१५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नवखा सलामीवीर बाबा इंद्रजित (१५) आणि आरोन फिंच ४ धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने नितीश राणाच्या सोबत चांगली भागीदारी केली. तो ३२ चेंडूत ३४ धावा काढून माघारी गेला. त्यानंतर नितीश राणा आणि रिंकू सिंग या जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, किपर), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन

कोलकाता नाइट रायडर्स: आरोन फिंच, सुनील नरिन, श्रेयस अय्यर (कर्णधार), बाबा इंद्रजित (किपर), नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसल, रिंकू सिंग, उमेश यादव, टीम साऊदी, शिवम मावी

टॅग्स :आयपीएल २०२२संजू सॅमसनकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्स
Open in App