नवी दिल्ली : जर एखाद्या खेळाडूने चांगला खेळ केला नाही किंवा असभ्य वर्तन केले तर त्याच्या कारकिर्दीवर विपरीत परीणाम होऊ शकतो. या गोष्टी बऱ्याचदा घडल्याही आहेत, पण एका खेळाडूच्या पत्नीने घातलेला गोंधळ त्याच्या कारकिर्दीसाठी अपायकारक ठरल्याचे तुमच्या ऐकिवात नसेल. पण अशी एक गोष्ट घडली आहे.
काही महिन्यांपूर्वी एका खेळाडूची उत्तेजक चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये तो खेळाडू दोषी आढळला. त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णयही घेण्यात आला. पण दुसरीकडे त्या खेळाडूला आपण दोषी कसे आढळलो, याचे उत्तर काही मिळत नव्हते. या खेळाडूचे युरिन टेस्ट घेण्यात आली होती. त्यानंतर त्या सॅम्पलची जेव्हा चाचणी करण्यात आली तेव्हा तो दोषी आढळला.
या चाचणीचा अहवाल या खेळाडूने मागितला, पण तरीही त्याला खुलासा होत नव्हता. कालांतराने आईच्या औषधांमधील काही घटक आपल्या शरीरात सापडल्याचे त्याला समजले. त्यानंतर त्याच्या बायकोलाही एक गोष्ट आठवली. सासूच्या कर्करोगाचे औषध तिने खेळाडूला दिले होते आणि बायकोच्या गोंधळामुळे पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शेहझादच्या कारकिर्दीत गडबड झाल्याचे समोर आले.