Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला खेळवणार का? रोहित शर्मा हसला अन् म्हणाला...; मार्क बाऊचरने दिली मोठी बातमी

IPL 2023 साठी आता सर्व संघांनी कंबर कसली आहे आणि नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) जेतेपदाच्या शर्यतीच्या प्रबळ दावेदारांमध्ये आघाडीवर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 01:17 PM2023-03-29T13:17:01+5:302023-03-29T13:17:21+5:30

whatsapp join usJoin us
Will Arjun Tendulkar play in IPL 2023? Mumbai Indians Captain Rohit Sharma smiled and said...; Big news from head coach Mark Boucher | Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला खेळवणार का? रोहित शर्मा हसला अन् म्हणाला...; मार्क बाऊचरने दिली मोठी बातमी

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरला खेळवणार का? रोहित शर्मा हसला अन् म्हणाला...; मार्क बाऊचरने दिली मोठी बातमी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Will Arjun Tendulkar play in IPL 2023? : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या पर्वाला ३१ मार्चपासून सुरूवात होत आहे. IPL 2023 साठी आता सर्व संघांनी कंबर कसली आहे आणि नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) जेतेपदाच्या शर्यतीच्या प्रबळ दावेदारांमध्ये आघाडीवर आहेत. पण, पाच वेळा आयपीएल जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्ससमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. मागच्या पर्वात जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) होता, परंतु जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) नव्हता. यावेळेस आर्चर आहे आणि बुमराह नाही. बुमराह नसल्याने युवा खेळाडूंना संधी मिळेल असे कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) म्हणाला. त्यावेळी त्याला अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar) यंदातरी संधी मिळेल का, असे विचारल्यावर त्याचं उत्तर मजेशीर होतं.

आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. गुजरात टायटन्सनेही अर्जुनला २० लाखांच्या मूळ किमतीसह विकत घेण्याची तयारी दर्शवली होती, पण अंतिम बाजी मुंबई इंडियन्सने मारली. अर्जुन तेंडुलकर गेल्या हंगामातही 'मुंबई इंडियन्स'चा भाग होता, पण IPL च्या त्या हंगामातदेखील तो एकही सामना खेळू शकला नाही. रोहित शर्माने मागील लढतीत अखेरच्या साखळी सामन्यात काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार असे विधान केले होते, पण अर्जुनला संधी मिळाली नाही.  


मुंबई इंडियन्सने मागील दोन पर्व अर्जुन तेंडुलकरला बाकावर बसवून ठेवले. मागील पर्वात त्याने दुखापतीमुळे आयपीएल अर्ध्यावर सोडले होते. बुमराहच्या गैरहजेरीत युवा गोलंदाजांना संधी देणार असे रोहितने सांगितले अन् अर्जुनच्या पदार्पणाचा प्रश्न समोर आलाच... त्यावर रोहित हसला अन् म्हणाला, चांगला प्रश्न आहे. आशा करतो की त्याला संधी मिळेल...

मार्क बाऊचरने दिले अपडेट्स
''अर्जुन तेंडुलकरला काल झालेल्या सराव सामन्यात दुखापत झाली, परंतु ती एवढी गंभीर नाही. मागील सहा महिन्यांत त्याने चांगला खेळ केला आहे,''असे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Will Arjun Tendulkar play in IPL 2023? Mumbai Indians Captain Rohit Sharma smiled and said...; Big news from head coach Mark Boucher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.