यदु जोशीमुंबई : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याने २९ मार्चपासून प्रारंभ होत असलेल्या आयपीएलच्या तेराव्या सत्रावर कोरोनाचे दाट सावट असून ही पूर्ण स्पर्धा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गर्दी टाळा असे आवाहन सगळीकडे केले जात असताना या आयपीएलच्या निमित्ताने देशभरातील स्टेडियमवर प्रचंड गर्दी होणार आहे. कोरोनाच्या दृष्टीने पुढचे १५-२० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशावेळी आयपीएलसाठी होणाऱ्या गर्दीने अडचणी वाढू शकतात. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते.आयपीएलमध्ये देशविदेशातील आघाडीचे क्रिकेटपटू सहभागी होतात. त्यांच्यापैकी काही क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खेळण्याबाबत असमर्थता व्यक्त केली तर आयोजकांची डोकेदुखी वाढणार आहे. मुंबई, दिल्ली, मोहाली, जयपूर, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, गुवाहाटीमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत. क्रिकेटपटू कोरोनाचे सावट असताना वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यास कितपत इच्छुक असतील हा प्रश्नही समोर आला आहे.मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर प्रारंभाचा सामना होत आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आयपीएलचे सामने रद्द करण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. पुढचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. संभाव्य कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे हे महत्त्वाचेच आहे. त्यादृष्टीने योग्य तो निर्णय चर्चेअंती घेतला जाईल.>आयपीएल रद्द करण्याचा कुठलाही विचार नाही. कोरोनाचे संकट या स्पर्धेवर दिसत नाही. - ब्रिजेश पटेल, अध्यक्ष, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल>कोरोनामुळे स्पर्धेत सहभागी होणार नाही असे कोणत्याही क्रिकेटपटूने अद्याप कळविलेले नाही. मात्र, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात त्याप्रमाणे पुढील १५ दिवस कोरोनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच मार्चमध्ये एकदा तापमान वाढले की कोरोना विषाणूचा दुष्परिणाम होणार नाही, असेही सांगितले जात आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढले तर या स्पर्धेबाबत अनिश्चितता राहू शकते.- अयाझ मेमनकन्सल्टिंग एडिटर, लोकमत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कोरोनामुळे यंदाची आयपीएल रद्द होणार?
कोरोनामुळे यंदाची आयपीएल रद्द होणार?
कोरोनाच्या दृष्टीने पुढचे १५-२० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशावेळी आयपीएलसाठी होणाऱ्या गर्दीने अडचणी वाढू शकतात. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते.
By यदू जोशी | Published: March 06, 2020 3:36 AM