पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सध्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. नुकतंच त्याने कारगील युद्धात भारताविरुद्ध लढण्याची तयारी दर्शवली होती. आता त्याने पाकिस्तान लष्कराचे सामर्थ्य वाढवण्याची गरज आहे आणि त्यासाठी बजेट वाढवला पाहिजे असे म्हटले आहे. त्यासाठी गरज पडल्यास गवत खाण्याची तयारी त्याने दर्शवली आहे.
"जर मला अल्लाहने अधिकार दिल्यास, मी गवत खाईन, परंतु आपल्या लष्कराचे बजट वाढवीन,"असे अख्तर म्हणाला. त्याने यावेळी त्याने खाजगी क्षेत्र संयुक्तपणे लष्करासोबत का काम करत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला. तो म्हणाला," लष्करप्रमुखांना विचारू इच्छितो की, माझ्यासोबत बसा आणि निर्णय घ्या. लष्कराचा बजेट २० टक्के असेल तर तो ६० टक्के करा. जर आपण एकमेकांचा पाणउतारा करत असू, तर नुकसान आपलेच आहे."
तो म्हणाला,''मला त्यावेळी 1 लाख 75 पाऊंडचा नॉटिंगहॅमकडून करार होता. त्यानंतर 2002मध्ये मला मोठ्या कराराची ऑफर होती. मी कारगिल युद्धासाठी त्या दोन्ही करारावर पाणी सोडलं. मी त्यावेळी लाहोरच्या बाहेरच होतो. तेव्हा तू येथे काय करतोस, असे जनरलनं मला विचारलं. युद्ध कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकतं आणि देशासाठी जीवही देण्यास तयार आहे. त्यासाठी मी दोनवेळा कौंटी क्रिकेट सोडलं. मी त्याची पर्वा केली नाही. मी काश्मीरमधील माझ्या मित्रांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी युद्धासाठी सज्ज आहे.''
PakPassion ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं हा दावा केला. ''भारताकडून आलेल्या लढाऊ विमानांनी जेव्हा आमच्या येथील झाडांना पाडलं, ते आमच्यासाठी मोठं नुकसान होतं. त्यांनी 6-7झाडं पाडली. मला खूप वेदना झाल्या होत्या. मला चक्कर आल्यासारखं वाटत होतं आणि मी झोपेतून दचकून उठायचो. हे असं बरेच दिवस सुरू होतं,''असेही त्यानं सांगितलं.
बबिता फोगाटवर कृपादृष्टी का? आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूची भाजपा सरकारवर टीका
गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय; असदुद्दीन ओवेसी भडकले