Join us  

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत पाऊस ठरणार का खलनायक...

हा सामना इंदूर येथे होणार असून येथे काही दिवसांपासून काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळेच पाऊस आता या कसोटी सामन्यासाठी खलनायक ठरणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 4:01 PM

Open in App

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका संपलेली आहे. त्यामुळे आता साऱ्यांनाच वेध लागले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला १४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा सामना इंदूर येथे होणार असून येथे काही दिवसांपासून काळे ढग जमा झाले आहेत. त्यामुळेच पाऊस आता या कसोटी सामन्यासाठी खलनायक ठरणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत मैदानाचे क्युरेटर समंदर सिंह चौहान यांनी सांगितले की, " गेल्या काही दिवसांपासून स्टेडियमजवळ काळे ढग दाटून आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येथे पाऊस कधीही पडू शकतो. त्यामुळे कोणतीही जोखीम न उचलता आम्ही खेळपट्टी झाकून ठेवली आहे."

भारतीय क्रिकेटच्या 'विकासा'साठी सौरव गांगुलीचं आणखी एक मोठं पाऊल; जाणून घ्या नेमकं काय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच अनेक सकारात्मक निर्णय घेतले. त्याच्याच पुढाकारानं भारतीय संघ प्रथम डे नाईट कसोटी सामना खेळणार आहे. कोलकाता येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात डे नाइट कसोटी सामना होणार आहे. शिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना मानधनाचा मुद्दाही गांगुलीनं मांडला. आता गांगुलीनं आणखी एक सकारात्मक पाऊल उचललं आहे. त्या दृष्टीनं त्यानं इरफान पठाण आणि परवेझ रसूल या खेळाडूंची भेट घेतली आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आल्यानंतर उत्तर भारतात क्रिकेटच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं गांगुलीनं म्हटलं होतं. त्यादिशेनं पाऊल उचलताना गांगुलीनं जम्मू व काश्मीरमधील क्रिकेटला चालना देण्याचं आश्वासन दिले. जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार रसूल आणि माजी कसोटीपटू इरफान यांच्यासह बीसीसीआयचे काही प्रतिनिधिंनी गांगुलीची भेट घेतली.''बीसीसीआय अध्यक्षांनी आमचे सर्व मुद्दे जाणून घेतले आणि जम्मू काश्मीरमध्ये क्रिकेटच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा पुरवा, अशी विनंती करण्यात आली आहे,'' असे जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा क्रिकेटचे सामने खेळवण्याचं दादानंही मान्य केल्याचं कळतं. ''जम्मू काश्मीर संघाला घरच्याच मैदानावर त्यांचे सामने खेळण्याची संधी पुन्हा मिळावी. आमच्याकडे महाविद्यालयीन मैदान आहे आणि त्याची दुरुस्ती केली अन् योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथे प्रथम श्रेणीचे सामने होतील,'' असे सूत्रांनी सांगितले. जम्मू- काश्मीरचा संघ सध्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचा सामना सुरत येथे खेळत आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेश