मुंबई : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पहिला डे नाइट टेस्टची लज्जत साऱ्यांनीच उचलली. हा एक ऐतिहासिक सामना होता. आता या सामन्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा संघ डे नाइट टेस्ट खेळणार का, या चर्चांना उत आला आहे. पण या दौऱ्यात भारत डे नाइट टेस्ट खेळणार का, याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठे विधान केले आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्याीतील डे नाइट टेस्ट झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघानेही भारताला आमच्या देशात येऊन डे नाइट टेस्ट खेळावी, अशी विनंती करणार आहेत. त्याचबरोबर आता भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यात डे नाइट टेस्ट खेळणार का, याची उत्सुकता सर्वांना आहे.
न्यूझीलंडमधील कसोटी सामने भारतीय वेळेनुसार पहाटे ३ वाजता सुरु होतात. त्यामुळे जर न्यूझीलंडमध्ये डे नाइट टेस्ट खेळवण्यात आली तर हा सामना जास्त भारतीय पाहू शकतील. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये डे नाइट टेस्ट झाली तर त्याचा भारताला फायदा होईल, त्यामुळे आता बीसीसीआय यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे असेल.
न्यूझीलंडमध्ये डे नाइट टेस्ट खेळवायची की नाही, याबाबत गांगुली म्हणाले की, " भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत डे नाइट टेस्ट खेळवायची की नाही, याबाबत बरीच चर्चा सुरु आहे. पण सध्याच्या घडीला आम्ही या गोष्टीचा पूर्णपणे विचार केलेला नाही. जेव्हा ही मालिका जशी जवळ येईल, त्यावेळी आम्ही या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून निर्णय घेऊ."