कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आयपीएल होणार की नाही असा संभ्रम क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. पण, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयनं आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळानं आयपीएलच्या 13व्या मोसमाचे आयोजन करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयसमोर ठेवला आहे. पण, लंकन मंडळाच्या या प्रस्तावावर बीसीसीआयनं महत्त्वाचं विधन केलं आहे.
श्रीलंका क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी सांगितले की,''आयपीएलच्या आयोजनासाठी आम्ही बीसीसीआयकडे प्रस्ताव ठेवत आहे. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल. त्यामुळे 2009 प्रमाणे त्यांनी आयपीएल परदेशात खेळवल्यास, त्याचा फायदा त्यांनाच होईल. श्रीलंकन क्रिकेट मंडळ त्यासाठी बीसीसीआयला सर्व सुविधा पुरवण्यासाठी तयार आहोत. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयपीएलच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन आम्ही करू.''
त्यावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं Republic TV ला सांगितलं की,''अजून श्रीलंकन क्रिकेट मंडळाकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार होईल किंवा होणारही नाही. पण, खरं सांगायचं तर तशी शक्यता फार कमी आहे. परदेशी खेळाडूंची उपलब्धता आणि त्यांच्या राहण्याची सोय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.''
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं पुढे सांगितलं की,''श्रीलंकन क्रिकेट मंडळानं आयपीएल आयोजनाबाबत पत्र पाठवलेलं नाही. आम्हालीही मीडियाकडून हे कळतंय. तसं पत्र आल्यात ते त्वरीत नाकारण्यात येणार नाही. त्याबाबत विचार केला जाईल आणि निर्णय घेतला जाईल. पण, आताच त्याबाबत सांगणे घाईचे ठरेल, परंतु तशी शक्यता फार कमी आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूची कोरोनाशी लढाई; प्रकृती चिंताजनक
Video: धर्माच्या नावाखाली धंदा सुरू आहे; आता तरी सुधरा...; इरफान पठाणचा मार्मिक टोला
'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या व्हिडीओने खळबळ, ‘तबलिगी जमात’वर प्रक्षोभक टीकास्त्र
भारताविरुद्ध मालिका होत नसल्यानं पाकिस्तानला 690 कोटींचा फटका!