इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या The Hundred लीगला अवघ्या ४ दिवसांत दुसरा शतकवीर मिळाला. विल स्मीद ( Will Smeed) नंतर विल जॅक्सने ( Will Jacks) शतकी खेळी केली. पण, त्याचं हे शतक The Hundred लीगमधील सर्वात जलद शतक ठरले आणि त्याने मुंबई इंडियन्सच्या नव्या फ्रँचायझीच्या ताफ्यातील विल स्मीदचा विक्रम मोडला. साउदर्न ब्रेव्ह विरुद्ध ओव्हल इनव्हिजिबल ( OVAL INVINCIBLES ) यांच्यातल्या सामन्यात विल जॅक्सने ही वादळी खेळी केली. संघाच्या एकूण लक्ष्याच्या ७६ टक्क्याहून अधिक धावा या जॅक्सने करताना नवा विक्रम नावावर केला.
Kieron Pollard, ड्वेन ब्राव्हो व निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसणार; MI Emirates ने जाहीर केला १४ खेळाडूंचा संघ
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ( पुरुष) संघाच्या एकूण धावांपैकी एका खेळाडूचा सर्वाधिक वाटा उचलण्याचा विक्रम जॅक्सने नावावर केला. त्याने दी हंड्रेड लीगमध्ये जलद शतक झळकाताना ओव्हलच्या एकूण धावांमध्ये ७६.०५ टक्के धावा केल्या. यापूर्वी ऑसींच्या आरोन फिंचने ( ७५.१० टक्के) २०१८ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध २ बाद २२९ धावांपैकी १७२ धावा स्वतः केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करतानाची दी हंड्रेड लीगमधील जॅक्सची ही खेळी सर्वोत्तम ठरली. त्याने डेवीड मलानचा नाबाद ९८ धावांचा विक्रम मोडला.