कोलकाता नाइट रायडर्सचा सह मालक शाहरुख खान ( Shah Rukh Khan) याला कॉफी पिण्यासाठी आयपीएल २०२१चा कप हवा आहे. ऐकायला विचित्र वाटतंय ना, पण हे स्वतः शाहरुखनं सोशल मीडियावरून सांगितले आहे. सोशल मीडियावर शाहरुखनं बुधवारी त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली. त्यापैकी एका प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखनं असा रिप्लाय दिला.
- फॅनचा प्रश्न - भाई, KKR कप लाएगी ना ईस बार?
- शाहरुखचे उत्तर - आशा तर आहे. मी त्या कपातूनच कॉफी पिण्यास सुरुवात करेन.
कोलकाता नाइट रायडर्सनं २०१४ मध्ये शेवटचा आयपीएल चषक उंचावला होता. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिंकलेला तो दुसरा आयपीएल चषक होता. २०१८च्या लिलावात कोलकाता संघानं ७.४० कोटींत दिनेश कार्तिकला ताफ्यात दाखल करून घेतले आणि त्याच्याकडे नेतृत्व सोपवले. २०१८मध्ये त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते, परंतु मागील दोन पर्वात त्यांना अपयश आलं.
कार्तिकनं नेतृत्वाची धुरा इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याच्या खांद्यावर सोपवली. कार्तिकच्या नेतृत्वाखाली KKRनं ३७ पैकी १९ सामने जिंकले, तर १७ मध्ये पराभव पत्करला. यंदाच्या पर्वात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ११ एप्रिलला KKR पहिला सामना खेळणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - रिटेन खेळाडू : शुभमन गिल, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, नीतीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, हैरी गर्नी, लोकी फर्ग्यूसन, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, पॅट कमिन्स इयोन मोर्गन, वरुण चक्र वर्ती, सिद्ध कृष्ण, रिंकूसिंग, संदीप वॉरियर, निखिल नाइक आणि राहुल त्रिपाठी
लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- शकिब अल हसन ( Shakib Al Hasan) ३.२० कोटी, शेल्डन जॅक्सन ( Sheldon Jackson) २० लाख, वैभव अरोरा ( Vaibhav Arora) २० लाख, करुण नायर ( Karun Nair) ५० लाख, हरभजन सिंग ( Harbhajan Singh) २ कोटी, बेन कटींग ( Ben Cutting) ७५ लाख, वेंकटेश अय्यर ( Venkatesh Iyer) २० लाख, पवन नेगी ( Pawan Negi) ५० लाख.
Web Title: Will KKR win IPL 2021 title? Shah Rukh Khan gives witty reply to fan's question
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.