ठळक मुद्देकमीत कमी क्रिकेट खेळून जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी काही खेळाडू देशाकडून न खेळता लीगमध्ये खेळताना दिसतात. त्यामुळे काही देशांनी या लीगबाबत तक्रार केली असल्याचे समजत आहे.
मुंबई : आयपीएल म्हणजे बीसीसीआयसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहे. आतापर्यंत आयपीएलमुळेबीसीसीआयने अब्जावधी रुपये कमावले आहेत. त्याचबरोबर बीसीसीआयने अन्य देशांच्या खेळाडूंनाही आयपीएलच्या जाळ्यात ओढून घेतले आहे. त्यामुळे काही खेळाडू आपल्या देशाकडून खेळत नसले तरी ते आयपीएलमध्ये नक्की खेळताना दिसतात. हीच गोष्ट बीसीसीआयसाठी धोक्याची ठरू शकते, असे म्हटले जात आहे.
आयपीएलनंतर बऱ्याच लीग सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ज्या खेळाडूंना देशाकडून खेळायला मिळत नाही किंवा खेळण्याची इच्छा नसते त्यांच्यासाठी या लीग एक चांगले माध्यम ठरत आहे. त्यामुळे कमीत कमी क्रिकेट खेळून जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी काही खेळाडू देशाकडून न खेळता लीगमध्ये खेळताना दिसतात. त्यामुळे काही देशांनी या लीगबाबत तक्रार केली असल्याचे समजत आहे.
आयसीसीची २० ऑक्टोबरला सिंगापूर येथे एक बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आयपीएल आणि अन्य काही लीगवर वचक ठेवण्याचा आयसीसीचा विचार आहे. त्यामुळे आता आयपीएल खेळणे बीसीसीआयसाठी फारसे सोपे नसेल, असे म्हटले जात आहे.
Web Title: ... this will not be easy for the BCCI to play IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.