Join us  

विराट कोहलीबद्दलची ही भविष्यवाणी खरी ठरणार?

2018 हे वर्ष कोहलीसाठी लकी असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा तगड्या संघांविरुद्धदेखील कोहली कसोटी मालिका जिंकून देईल.   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 1:28 PM

Open in App

केपटाऊन - विराट कोहली भारतीय संघाचा परदेशातील विजयाचा दुष्काळ संपवणार असल्याची भविष्यवाणी नागपूरचे ज्योतिषी आणि क्रिकेट प्रशंसक नरेंद्र बुंदे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे  कर्णधार विराट कोहलीसाठी 2018 साल अत्यंत भरभराटीचे ठरणार असल्याचे भाकितही त्यांनी वर्तविले आहे. सध्या भारतीय टीम द.अफ्रिकेत कसोटी मालिका खेळत आहे व त्यानंतरही संघाचे अनेक परदेश दौरे आहेत. त्यामुळे विराट कोहलीवर मोठी जबाबदारी आहे. बुंदे यांच्या मते परदेशात टीम इंडिया सर्वत्र विजयच मिळवेल असे नसले तरी आजवरच्या तुलनेत टीम इंडियाची कामगिरी नक्कीच चांगली होणार आहे. तसेच विराटचा शुक्र ग्रह अतिबलवान असल्याने क्रिकेट इतिहासातील मोठे डील या वर्षी त्याच्या पदरात पडणार आहे.

चार महिन्यांपूर्वी धोनीचा फॉर्म आणि त्याची खेळातील कामगिरी घसरल्यानंतर धोनी 2019 चा विश्वकप खेळणार काय अशी चर्चा उधाणावर असताना बुंदे यांनी धोनी 2019 चा वर्ल्ड कप खेळेल असे भाकित वर्तविले होते. 2006 पासून बुंदे क्रिकेट संदर्भातील भाकिते वर्तवित आहेत. त्यांच्याकडे आजपर्यंत जहीरखान, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, मुरली कार्तिक, श्रीसंत,गौतम गंभीर, सुरेश रैना यांनी सल्ला घेतला आहे. भारतीय महिला टीमची कप्तान मिताली राज हिला बुंदे यांनी 33 नंबरची जर्सी वापरण्याचा सल्ला दिला होता तसेच रणजी कप विजेत्या विदर्भ संघातील फैजल यालाही स्थानिक सामन्यात 24 नंबरची जर्सी वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला होता व या दोघांनाही हा सल्ला चांगलाच उपयोगी ठरल्याचे सिद्ध झाले आहे.

सचिनबद्दलची भाकिते - सचिन टेनिस एल्बोच्या जखमेतून यशस्वी पुनरागमन करणार, वन डेत पहिली द्विशतकी खेळी करणार, २०११ चा विश्वचषक खेळणार, २०१२ मध्येच शतकांचे शतक नोंदविणार, २०१२ मध्येच निवृत्ती जाहीर करणार तसेच सचिनला भारतरत्न  मिळणार ही ती सर्व भाकिते होती विराट भारताला तीन विश्वचषक जिंकून देणार?टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा कन्या राशीत मोडतो. तो भारताच्या उत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असून, त्याच्या नेतृत्वात भारताला तीन विश्वचषक जिंकता येतील, असा बुंदे यांनी दावा केला. 2018 हे वर्ष कोहलीसाठी लकी असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा तगड्या संघांविरुद्धदेखील कोहली कसोटी मालिका जिंकून देईल.   

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघसचिन तेंडूलकर