राहुल द्रविड ( Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड ही अंतिम टप्प्यात आली असून आता केवळ औपचारिकता बाकी आहे. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रविवारी अर्ज मागवले आहेत. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक या पदांसाठीही अर्ज मागवले आहेत. शिवाय द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार असल्यानं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं ( NCA) अध्यक्षपद रिक्त होणार आहे आणि त्यासाठीही अर्ज मागवण्यात आले आहेत. मुख्य प्रशिक्षकपदासाठी २६ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज पाठवायचे आहे, तर अन्य पदांसाठी ३ नोव्हेंबरची अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.
कोणकोणत्या पदांसाठी मागवलेत अर्ज१ मुख्य प्रशिक्षक ( वरिष्ठ संघ) २ फलंदाजी प्रशिक्षक ३ गोलंदाजी प्रशिक्षक ४ क्षेत्ररक्षक प्रशिक्षक ५ Head Sports Science/Medicine with National Cricket Academy (NCA)
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि ते करारात वाढ करण्यात इच्छुक नाहीत. त्यांच्या जागी राहुल द्रविडचं नाव निश्चित झालं आहे. सुरुवातीला द्रविडनं या जबाबदारीस नकार दिला होता, परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं त्याला राजी केलं. द्रविडनं सहा वर्ष भारताच्या अ व १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि सध्या तो NCAचा अध्यक्ष आहे.
राहुल द्रविडने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला आहे. द्रविडसोबतचा हा करारा २०२३ पर्यंत असेल. याचा अर्थ हा करार २०२३च्या विश्वचषकापर्यंत असेल. या काळात वेतन म्हणून द्रविडला दरवर्षी १० कोटी रुपये वेतन मिळेल