मुंबई : भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्धच्या सामन्या अपयशी ठरला. त्यामुळे आता पंतला किती संधी द्यायच्या, असा प्रश्न आता चाहते विचारायला लागले आहेत. पण आता या गोष्टीमध्ये उडी घेतली आहे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी.
पंतला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात आपली छाप पाडता आली नाही. फलंदाजी करताना पंतला ९ चेंडूंत ६ धावा करता आल्या. यष्टीरक्षणामध्येही त्याला फारसी चमक दाखवता आली नाही. पंतने रोहितला एक DRS घेण्यासाठी भाग पाडले. त्यावेळी पंत हा आत्मविश्वासाने रोहितला सांगत होता. पण यावेळीही पंतचा निर्णय चुकल्याचेच पाहायला मिळाले. त्यावेळी रोहितने डोक्यावर हात मारल्याचेही पाहायला मिळाले.
याबाबत सुनील गावस्कर यांनी सांगितले की, " जर एखादा व्यक्ती दहावेळा चांगले काम करतो आणि एकदा त्याच्याकडून जर चूक होते तेव्हा त्याची चर्चा होते. पंतबरोबरही असेच काहीसे सुरु आहे. पंत यष्टीरक्षण करताना ९५ टक्के गोष्टी योग्य करतो, पण एका गोष्टीमध्ये त्याच्याकडून चूक होते आणि त्याचीच जास्त चर्चा होते."
Web Title: Will Rishabh Pant gets a chance again, read what Sunil Gavaskar said
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.