इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो शुक्रवारी बंद झाली. प्रत्येक संघांनी रणनीतीनुसार अनेक खेळाडूंना कायम राखले, तर काहींना डच्चू दिले. या रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये काही मोठी नावही आहेत. त्यामुळे आता उत्सुकता लागलीय ती 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या आयपीएल 2020च्या लिलावाची. आयपीएल ट्रेडमध्ये 11 खेळाडूंची अदलाबदली झाली. यात कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं रिलीज केलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लीननं मंगळवारी टी 10 लीगमध्ये वादळी खेळी केली. त्यानंतर KKRचा हा निर्णय चुकल्याचं मत व्यक्त केलं गेलं. टी 10 लीगमध्ये युवराज सिंग प्रतिनिधित्व करत असलेल्या मराठा अरेबियन्स संघाकडून लीननं ही खेळी साकारली. त्यामुळे लीनसाठी KKRचा मालक शाहरुख खान याच्याकडे शब्द टाकण्याची तयारी युवीनं दर्शवली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- KKRनं डच्चू दिलेल्या फलंदाजाची तुफानी खेळी; शाहरुख खानशी बोलण्याची युवराज सिंगची तयारी
KKRनं डच्चू दिलेल्या फलंदाजाची तुफानी खेळी; शाहरुख खानशी बोलण्याची युवराज सिंगची तयारी
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) पुढील मोसमासाठीची ट्रेड विंडो शुक्रवारी बंद झाली.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 10:05 AM