Join us  

WTC Final: फायनलमध्ये रोहितसोबत हा खेळाडू करणार ओपनिंग? शुभमन गिलचा पत्ता होऊ शकतो कट 

WTC Final, India Vs Aus: आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हलच्या  मैदानावर खेळवला जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 2:12 PM

Open in App

आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हलच्या  मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तसेच सलामीवीर म्हणूनही जबाबदारी पार पाडणार आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा याची आघाडीच्या सलामीवीरांमध्ये गणना होते. त्याने हल्लीच आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं होतं. त्यात मुंबई इंडियन्सने प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. रोहित शर्मा मुंबईचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर लंडनकडे रवाना झाला होता. आता ७ जूनपासून सुरू होणाऱ्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीला येईल, असं मानलं जात आहे. मात्र निवड समितीचे माजी सदस्य शरणदीप सिंग यांच्या एका वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

शरणदीप सिंग यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ईशान किशन हा एक्स फॅक्टर ठरू शकतो. रिषभ पंत रस्ते अपघातात जखमी झाल्याने ईशान किशन आणि के.एस. भरत यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. दोघांचाही यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. ईशान किशनने आतापर्यंत कसोटी क्रिकेट खेळलेलं नाही. मात्र शरणदीपच्या म्हणण्यानुसार तो एक्स फॅक्टर ठरू शकतो. किशनने आतापर्यंत १४ वनडे आणि २७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

शुभमन गिलने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत ऑरेंज कॅप पटकावली होती. भारतीय संघात खेळण्यासाठी त्याचा दावा भक्कम आहे. मात्र यष्टीरक्ष म्हणून ईशान किशनची निवड झाल्यास संघव्यवस्थापनासमोर आव्हान निर्माण होऊ शकतं. शरणदीपच्या म्हणण्यानुसार ईशान किशन एक्स फॅक्टर बनू शकतो. मात्र अंतिम सामन्यात यष्टीरक्ष म्हणून भरतलाच संधी मिळू शकते. भरतने आतापर्यंत केवळ ४ कसोटी सामने खेळले आहेत. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशुभमन गिलइशान किशन
Open in App