भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे प्रचंड टेंशन... त्यात आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ही दोघं पहिल्याच सामन्यात एकमेकांसमोर उभी ठाकणार आहेत. त्यामुळे आतापासूनच क्रिकेट चाहते २४ ऑक्टोबरची प्रतीक्षा करत आहेत. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं आधीच यासामन्यात आमच्यापेक्षा टीम इंडियावर अधिक दडपण असेल असे जाहीर करताना यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास बदलू, असा दावा केला आहे. त्यात आता पाकिस्तानी गोलंदाज हसन अली ( Hasan Ali) यानेही यानंही टीम इंडियाला पराभूत करण्याची भाषा केली आहे. हसन अलीनं मागच्याच वर्षी भारतीय मुलगी ( भारताचा 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4'!) शामिया आरझूशी विवाह केला आहे.
हार्दिक, जसप्रीत अन् रोहितनं धरला मराठी गाण्यावर ठेका; मुंबई इंडियन्सचं मराठमोळं गाणं पाहिलं का?
२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं ज्याप्रकारे टीम इंडियाला पराभूत केलं होतं, तसाच खेळ केल्यास ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्येही भारतावर विजय मिळवू शकतो, असा दावा हसन अलीनं केला. पण, त्या पराभवानंतर टीम इंडियानं २०१८च्या आशिया चषक ( ५० षटक) स्पर्धेत व २०१९च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये त्यांच्यावर विजय मिळवला आहे. तो म्हणाला,''२०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये आम्ही त्यांना पराभूत केलं होतं आणि तो काळ आमच्यासाठी चांगला होता. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला पराभूत करण्याचा प्रयत्न करू. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू. भारताविरुद्धच्या सामन्यात दोन्ही देशांच्या चाहत्यांच्या प्रचंड अपेक्षा असतात आणि त्यामुळे दडपणही असतंच ''
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या ट्विटनंतर कॉलीन डी ग्रँडहोमला वाहिली जातेय श्रद्धांजली, जाणून घ्या कारण
''जे क्रिकेटला फॉलो करत नाहीत, तेही भारत-पाकिस्तान सामना आवर्जुन पाहतात. त्यामुळे खेळाडूंवरील दडपण अधिक वाढते, परंतु आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू. पण, यूएईतील खेळपट्टीचा आम्हाला चांगला अभ्यास आहे, त्यामुळे येथे कशी गोलंदाजी करायची हे आम्हाला चांगलं माहित्येय. सर्व संघांनीही त्यानुसारच आपापल्या ताफ्यात फिरकीपटूंना अधिक स्थान दिले आहे,''असेही तो म्हणाला.
पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी