Virat Kohli's Son Akaay ( Marathi News ) : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-वडील झाले. अनुष्काने १५ फेब्रुवारीला मुलगा अकायला जन्म दिला. वैयक्तिक कारण सांगून विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून BCCI कडे ब्रेक मागितला होता. मंगळवारी विराट आणि अनुष्काने सोशल मीडियावर घोषणा केली की वामिकाचा धाकटा भाऊ अकाय या जगात दाखल झाला आहे. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे, की लंडनमध्ये जन्मलेला अकायला ब्रिटिश नागरिकत्व मिळेल का?
विराट कोहली व अनुष्का शर्मा यांना तीन वर्षांची मुलगी आहे आणि वामिका असे तिचे नाव आहे. अकायच्या जन्माची बातमी देताना विराटने पोस्टे लिहिली की, "आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी आम्ही आमचा मुलगा याचे स्वागत केले. वामिकाच्या धाकट्या भावाचे या जगात स्वागत केले. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर करा. धन्यवाद."
विराटची पत्नी अनुष्काने लंडनच्या रुग्णालयात अकायला जन्म दिला. त्यामुळे आता अनेकांना प्रश्न पडलाय की, अकाय ब्रिटिश नागरिक आहे का?
एखाद्या मुलाचा जन्म ब्रिटनमध्ये झाला असला तरी त्याला ब्रिटिश नागरिक म्हटले जात नाही. त्याच्या पालकांपैकी एक ब्रिटिश नागरिक असेल किंवा त्यांनी तेथे दीर्घकाळ राहून स्थायिक दर्जा प्राप्त केला असेल तरच तो ब्रिटिश नागरिक होऊ शकतो. मुलाचे पालक ब्रिटीश नागरिक असतील आणि जर मुलाचा जन्म यूकेच्या बाहेर झाला असला तरी तो ब्रिटिश नागरिक होऊ शकतो. विराट कोहली आणि अनुष्काने लंडनमध्ये घरही विकत घेतले आहे, पण असे असूनही अकाय ब्रिटिश नागरिक होऊ शकत नाही. अकायचा पासपोर्ट यूकेमध्येच बनवला जाणार असला तरी त्याला भारतीय नागरिक म्हटले जाईल.
विराट कोहली पाचव्या कसोटीत खेळणार?
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत संघात नाव असूनही विराटने माघार घेतली होती. विशाखापट्टणम कसोटीनंतर विराट राजकोट येथे खेळेल अशी आशा होती आणि विराटच्या रिप्लायची वाट पाहत बीसीसीआयने संघ उशीरा जाहीर केला. पण, त्यातही विराटचे नाव दिसले नाही आणि तो चौथी कसोटीही खेळणार नाही, हे बीसीसीआयच्या कालच्या ट्विटने स्पष्ट झाले. पण, आता तरी तो पाचव्या कसोटीत खेळेल का असा प्रश्न पडतोय. BCCI ने चौथ्या कसोटीचा संघ काल जाहीर केला. याचा अर्थ पाचव्या कसोटीत विराटच्या पुनरागमनाची आशा अजूनही कायम आहे.
Web Title: will virat kohli & anushka sharma son Akaay will be british citizen, know rule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.