भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) साउथ आफ्रीका दौऱ्यावर वनडे सीरीज खेळणार की नाही, या प्रश्नाचे अनेकांना उत्तर हवे आहे. कोहलीने साउथ आफ्रीका दौऱ्यात होणाऱ्या वनडे सीरीजमधून सुट्टी मागितली असल्याची चर्चा सुरू आहे. पण, आता यावर बीसीसीआय सूत्रांकडून मोठे अपडेट आले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, टेस्ट कर्णधार विराट कोहलीने साउथ आफ्रीका दौऱ्यात वनडे सीरीज न खेळण्याबाबत कोणतीही विनंत केलेली नाही.
सेंच्युरियन येथे 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहली भारताचे नेतृत्व करेल. कसोटी मालिकेची समाप्ती 15 जानेवारी रोजी केपटाऊन येथे होणार्या तिसर्या आणि शेवटच्या कसोटीने होईल. यानंतर 19 जानेवारीपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. उपकर्णधार रोहित शर्मा डाव्या पायाच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर कोहली कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी विश्रांती घेणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
विराट कोहलीने सुट्टी मागितली नाही
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कोहलीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली किंवा सचिव जय शाह यांना वनडेत न खेळण्यासाठी आतापर्यंत कोणतीही औपचारिक विनंती पाठवली नाही. नंतर निर्णय घेतला गेला किंवा त्याला दुखापत झाली तर वेगळी बाब आहे. आजच्या अपडेटनुसार विराट कोहली 19, 21 आणि 23 जानेवारीला होणाऱ्या तीन वनडेत खेळणार आहे.
कुटुंबाला सोबत नेता येणार
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, बायो-बबल निर्बंधांमुळे खेळाडूंचे कुटुंब देखील त्याच चार्टर्ड विमानाने प्रवास करतील ज्यामध्ये खेळाडू आणि अधिकारी प्रवास करतील. कर्णधार त्याच्या कुटुंबासह प्रवास करणार आहे. पण हो, जर विराटला कसोटी मालिकेनंतर जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणाचा कंटाळा आला असेल आणि त्याला विश्रांती हवी असेल तर तो निवड समितीचे अध्यक्ष आणि सचिव (शहा) यांना नक्कीच सांगेल.
मुलीच्या वाढदिवशी विराट 100वी कसोटी खेळणार
भारताला पुन्हा एकदा मायदेशी परतल्यावर 3 आठवडे बायो बबलमध्ये राहावे लागणार आहे. कारण श्रीलंकेचा संघ कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येत आहे. मुलगी वामिकाच्या पहिल्या वाढदिवसामुळे (11 जानेवारी) कोहलीही ब्रेक घेऊ शकतो, अशीही बातमी आहे. त्या दिवशी कोहली आपला 100 वा कसोटी सामना खेळणार आहे.
Web Title: Will Virat Kohli play ODI series or not? BCCI official gave big information
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.