वेलिंग्टन : कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा ठोकण्याचा मान मिळविणाऱ्या केन विल्यमसनने सोमवारी २६वे कसोटी शतक झळकविले. त्याच्या शतकामुळे (१३२ धावा, २८२ चेंडू, १२ चौकार) दुसऱ्या कसोटीत फॉलोऑनमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाचा दुसरा डाव ४८३ धावांवर आटोपला. केनने २२६ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. टॉम ब्लंडेलने ९० धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडने चौथ्या दिवशी इंग्लंडला २५८ धावांचे लक्ष्य दिले.
प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी एक बाद ४८ धावा केल्या. झॅक क्राउलीला (२४) टिम साऊदीने त्रिफळाबाद केले. बेन डकेट २३ धावांवर खेळत असून, ओली रॉबिन्सन हा एका धावेवर त्याला साथ देत आहे. इंग्लंडला अखेरच्या दिवशी २१० धावांची गरज असून, त्यांचे नऊ फलंदाज शिल्लक आहेत.
त्याआधी दिवसाच्या पहिल्या षटकात विल्यमसनने जेम्स ॲंडरसनला मिड विकेटवर चौकार ठोकताच माजी सहकारी रॉस टेलरला (७६८२) धावा मागे टाकले.
मागच्या तीन डावांत केवळ दहा धावा करू शकलेला विल्यमसन याने आज कठीण स्थितीत संघाला सावरले. इंग्लंडने ८ बाद ४३५ धावांवर पहिला डाव घोषित केला होता. न्यूझीलंडने केवळ २०९ धावा केल्याने त्यांना फॉलोऑनची नामुष्की झेलावी लागली होती.
चौथ्या दिवसाची सुरुवात ३ बाद २०२ वरून केली त्यावेळी यजमान संघ २४ धावांनी मागे होता. विल्यमसन आणि हेन्री निकोल्स २९ यांनी धावसंख्येला आकार दिला. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी केली. विल्यमसन ३४ धावांवर खेळत असताना सहकारी डेरिल मिशेलने ५२ चेंडूंत आक्रमक अर्धशतक गाठले. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी ७५ धावा कुटल्या.
रॉस टेलरचा विक्रम मोडला
या शतकासह केन विल्यमसन न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. विल्यमसनने ९२व्या कसोटीत २८२ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांच्या मदतीने १३२ धावा केल्या. त्याने रॉस टेलरला मागे टाकले. टेलरच्या ११२ सामन्यांत ४४.६६च्या सरासरीने ७६८३, तर विल्यमसनच्या ७७८७ धावा आहेत.
हॅरी ब्रूक ‘मॅन ऑफ गोल्डन हॅन्ड’!
मिशेल माघारी परतल्यानंतर विल्यमसन-ब्लंडेल यांनी खेळाची सूत्रे स्वत:कडे घेत इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला होता. ही जोडी अखेर हॅरी ब्रूकने फोडली. ब्रूकने १५२ व्या षटकात कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच गोलंदाजी करीत पाय रोवलेल्या विल्यमसनला बाद केले. ब्रूकच्या चेंडूवर फोक्सने केनचा झेल टिपला. मायकेल ब्रेसवेल (८), टिम साऊदी साउथी (२) आणि मॅट हेन्री (००) हे लवकर बाद झाले. ब्लंडेलने १६६ चेंडूंत नऊ चौकार मारले. जॅक लीच याने १५७ धावांत पाच गडी बाद केले.
अखेरच्या दिवशी मोफत प्रवेश
कसोटी सामन्याची लोकप्रियता वाढविण्यासाठी न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यात येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. सोमवारी आयोजकांनी ही घोषणा केली. हे प्रशंसनीय पाऊल असल्याचे सांगून अनेक माजी खेळाडूंनी निर्णयाचे स्वागत केले.

Web Title: Williamson's century; New Zealand gave England a target of 258 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.