Join us  

Smith six on Range Rover, Video: धडामsss! फलंदाजाने मारलेला षटकार जाऊन पडला थेट Range Roverच्या टपावर... पुढे काय झालं पाहा

वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरू असताना ४८व्या षटकात घडला हा प्रकार.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 10:16 AM

Open in App

पहिल्या वन डे सामन्यात विंडिजने आयर्लंडचा २४ धावांनी पराभव केला. सबिना पार्क मैदानावर हा सामना रंगला होता. त्यात २७० धावांचा पाठलाग करणाऱ्या आयर्लंडचा संपूर्ण संघ २४५ धावाच करू शकला. विंडिजच्या विजयात नवोदित ब्रूक्स आणि कर्णधार पोलार्डचं मोठं योगदान होतं. पण जास्त चर्चा रंगली ती ओडीन स्मिथच्या षटकाराची. त्याने लगावलेला षटकार थेट रेंज रोव्हरवर जाऊन आदळला आणि कारचं नुकसान झालं.

विंडीजच्या फलंदाजीच्या वेळी ४८व्या षटकात ओडीन स्मिथ खेळत होता. आयर्लंडचा गोलंदाज लिटल याने त्याला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला. शेवटची षटकं शिल्लक असल्याने ओडीन स्मिथ तो चेंडू टोलवला. फटका इतका जबरदस्त होता की चेंडू थेट सीमारेषा ओलांडून मैदानाबाहेर गेला. त्याच वेळी पार्किंग लॉटमध्ये विंडिजचा खेळाडू शेल्डन जॅक्सन याची रेंज रोव्हर कार पार्क केलेली होती. स्मिथने मारलेला षटकात थेट रेंज रोव्हरच्या छतावर पडला आणि कार डेंट आला. घडलेला प्रकार तुफान व्हायरल झाला.

पाहा व्हिडीओ-

या प्रकारानंतर समालोचकांना जेव्हा समजलं की ती कार शेल्डन जॅक्सनची आहे त्यावेळी त्यांनाही हसू आवरलं नाही. ही कार इथे पार्क करणंच चुकीचं आहे, असं मजेशीर पद्धतीने म्हणत त्यांनी शेल्डनचं सांत्वन केलं.

दरम्यान, या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर विंडिजच्या डावाची सुरूवात खूप खराब झाली. पण पदार्पणाचा सामना खेळणारा शमराह ब्रूक्स (९३) आणि कर्णधार कायरन पोलार्ड (६९) यांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल १५५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला आणि संघाला २६९ धावांची मजल मारून दिली. २७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. पण आयर्लंडचा संघ २४५ धावाच करू शकला. आयरिश कर्णधार अँडी बलबर्नीने ७१ तर हॅरी हेक्टरने ५३ धावांची खेळी केली. पण इतर फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे आयर्लंडचा पराभव झाला.

टॅग्स :वेस्ट इंडिजआयर्लंडकार
Open in App