नॉर्थ पॉईंट : डेरेन ब्राव्होच्या कारकीर्दीतील चौथ्या शतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून पराभव करीत मालिका ३-० ने जिंकली. (The Windies won the series 3-0; In the last match, Sri Lanka lost by 5 wickets)
बार्बाडोस येथे द. आफ्रिकेविरुद्ध जून २०१६ नंतर शतक झळकविल्यानंतर ब्राव्होचे हे पहिले एकदिवसीय शतक होते. ब्राव्हो ४७ व्या षटकात १०२ धावा काढून बाद झाला. त्यावेळी श्रीलंकेने दिलेले ६ बाद २७४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी विंडीजला २६ धावांची गरज होती. ब्राव्होने कर्णधार किएरॉन पोलार्डसह (५३* धावा) सहाव्या गड्यासाठी ८० धावांची भागीदारी केली. विंडीजने ९ चेंडू आधीच विजय मिळवला. पहिल्या दोन वन डेत ब्राव्होने नाबाद ३७ आणि दहा धावांचे योगदान दिले होते. पहिल्या सामन्यात त्याने होपसोबत ११० तर दुसऱ्या सामन्यात एविन लुईससोबत १०३ धावांची भागीदारी केली होती.
त्याआधी विंडीजने दहा षटकात ३९ धावात दोन गडी गमावले. तथापि, ब्राव्हो व शाय होप यांनी तिसऱ्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारी केली. जेसन होल्डरने ४९ व्या षटकात षटकार खेचून सामना संपविला.श्रीलंकेने नाणेफेक गमावल्याने त्यांना फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. धनुष्का गुणतिलकाने ३६ व दिमूथ करुणारत्ने याने ३१ धावा केल्या. मधली फळी अपयशी ठरली. श्रीलंकेची ३२ षटकात ६ बाद १५१ अशी स्थिती होती. बंडाराने नाबाद ५५ धावा केल्या, तर सरंगाने ६० चेंडूत ७ चौकार व तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ८० धावा ठोकल्या.
संक्षिप्त धावफलक श्रीलंका: ५० षटकात ६ बाद २७४ धावा(गुणतिलका ३६, करुणारत्ने ३१, निसंका २४, शनाका २२, बंडारा ५५, वानिंदू हसरंगा नाबाद ८०, अकिल हुसेन ३/३३, जेसन मोहम्मद १/४९, अल्जारी जोसेफ १/५१.) पराभूत वि. वेस्ट इंडिज: ४८.३ षटकात ५ बाद २७६ धावा (शाय होप ६४, डेरेन ब्राव्हो १०२, किरोन पोलार्ड नाबाद ५५, सुरंगा लकमल २/५६, वानिंदू हसरंगा १/४९, तिसारा परेरा १/२७, गुणतिलका १/२८.)