Join us  

WIPL Franchises : अदानींनी सर्वाधिक रक्कम मोजून खरेदी केली महिलांची आयपीएल टीम; ५ संघ झाले फायनल

WIPL Franchises : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय जोरदार तयारी करत आहे. त्याचेळी बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा घेऊन येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 3:10 PM

Open in App

WIPL Franchises : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय जोरदार तयारी करत आहे. त्याचेळी बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा घेऊन येत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून महिला आयपीएलला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.  महिला आयपीएलसाठी बीसीसीआयने मागवलेल्या प्रसारण हक्कासाठीच्या बोलीत वायकॉम १८ ने डिझनी स्टार आणि सोनीला मागे टाकून पाच वर्षांसाठी ९५१ कोटींची सर्वाधिक बोली लावली. महिला क्रिकेटसाठी ही खूप मोठी झेप मानली जात आहे. त्यात बीसीसीआयनेही आता महिला आयपीएल यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. आज महिला आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या पाच संघांची नावंही जाहीर झाली. अदानी समुहाने सर्वाधिक रक्कम मोजून अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. 

कोणते पाच संघअहमदाबाद - अदानी मुंबई - रिलायन्स ( मुंबई इंडियन्स)बंगळुरू - डिएजीओ ( RCB)लखनौ - कॅप्री ग्लोबलदिल्ली - दिल्ली कॅपिटल्स 

अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटींत अहमदाबाद फ्रँचायझीचे हक्क जिंकले. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्सने सर्वात कमी १८० कोटींची बोली लावली. हल्दीरामने २४० कोटीं आणि कोलकाताने ६६६ कोटींची बोली लावली. 

बीसीसीआयने महिला खेळाडूंसाठी १२ कोटी ही सॅलरी कॅप ठरवली आहे. म्हणजे एका महिला खेळाडूला किमान १२ कोटी मिळू शकतात. ही कॅप दरवर्षी १.५ कोटींनी वाढवण्यात येईल आणि पाच वर्षांनंतर ती १८ कोटींपर्यंत जाईल. पुरुषांच्या आयपीएल प्रमाणे येथे मात्र आदर्श खेळाडू ही संकल्पना नाही. महिला आयपीएलमध्ये पाच संघांचा समावेश असणार आहे आणि तन वर्षांनंतर ही संख्या सहा करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. 

याशिवाय महिला आयपीएलमध्ये एका संघा पाच परदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली गेली आहे आणि या पाच खेळाडूंमध्ये एक खेळाडू हा संलग्न देशाच्या संघातील असायला हवा. पुरुष आयपीएलमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडूंनाच संधी दिली जाते.  

नीता अंबानी म्हणाल्या, “अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने मी आमच्या महिला क्रिकेट संघाचे MI #OneFamily मध्ये स्वागत करते. भारतीय क्रिकेटसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्याचा एक भाग झाल्याचा आम्हाला आनंद होत आहे. ही नवीन महिला लीग पुन्हा एकदा आमच्या मुलींची प्रतिभा, सामर्थ्य आणि क्षमता यावर जागतिक स्तरावर प्रकाश टाकेल. मला खात्री आहे की आमचा महिला MI संघ मुंबई इंडियन्सच्या निर्भय आणि मनोरंजक क्रिकेटला एका नवीन स्तरावर घेऊन जाईल.''

आकाश अंबानी म्हणाले, “मला आमच्या महिला क्रिकेट संघाचे, मुंबई इंडियन्स कुटुंबात सामील होणारी चौथी फ्रँचायझी यांचे हार्दिक स्वागत करताना आनंद होत आहे. महिला प्रीमियर लीगचा शुभारंभ हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि मला अभिमान आहे की या बदलात भारत आघाडीवर आहे. मी आगामी हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि मला विश्वास आहे की खेळातील महिलांच्या सक्षमीकरणावर WPL चा कायमस्वरूपी प्रभाव पडेल."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआयअदानी
Open in App