बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा घेऊन येत आहे आणि त्यात सहभागी होणाऱ्या पाच संघांची आज घोषणा करण्यात आली. महिला आयपीएलसाठी बीसीसीआयने मागवलेल्या प्रसारण हक्कासाठीच्या बोलीत वायकॉम १८ ने डिझनी स्टार आणि सोनीला मागे टाकून पाच वर्षांसाठी ९५१ कोटींची सर्वाधिक बोली लावली. महिला क्रिकेटसाठी ही खूप मोठी झेप मानली जात आहे. अदानी समुहाने सर्वाधिक रक्कम मोजून अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. पण, याच घोषणेसोबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या लीगच्या नावाचीही घोषणा केली.
अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटींत अहमदाबाद फ्रँचायझीचे हक्क जिंकले. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्सने सर्वात कमी १८० कोटींची बोली लावली. हल्दीरामने २४० कोटीं आणि कोलकाताने ६६६ कोटींची बोली लावली.
कोणते पाच संघ
- अहमदाबाद - अदानी
- मुंबई - रिलायन्स ( मुंबई इंडियन्स)
- बंगळुरू - डिएजीओ ( RCB)
- लखनौ - कॅप्री ग्लोबल
- दिल्ली - दिल्ली कॅपिटल्स
महिला आयपीएल नव्हे....!
जय शाह काय म्हणाले,'' २००८मध्ये पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेसाठी जेवढी रक्कम बोली प्रक्रियेत लावली गेली नव्हती त्यापेक्षा अधिक रक्कम पहिल्या महिलांच्या आयपीएल स्पर्धेसाठी लागली गेली आहे. एकूण ४६६९.९९ कोटींची बोली लावली गेली आहे आणि महिला क्रिकेटसाठी ही क्रांतिकारी घटना आहे. बीसीसीआय या लीगला महिला प्रीमिअर लीग Women's Premier League (WPL) असे नाव देत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: WIPL Franchises : Women's IPL has been named as Women's Premier League, BCCI secretary jay Shah announced name
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.