जयपूर, आयपीएल २०१९ : महिलांच्या आयपीएलमध्ये बाजी मारली ती सुपरनोव्हा संघाने. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या महिलांच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत सुपरनोव्हा संघाने व्हेलोसिटी संघावर चार विकेट्स राखून मात करत जेतेपदाला गवसणी घातली.
व्हेलोसिटी संघाने सुपरनोव्हापुढे १२२ धावांचे आव्हान आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग सुपरनोव्हा संघाने केला. सुपरनोव्हाची कर्णधार हरमनप्रीत कौरने दमदार अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
व्हेलोसिटी संघाने सुपरनोव्हापुढे १२२ धावांचे आव्हान आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना सुपरनोव्हा संघाची चांगली सुरुवात झाली नाही. आतापर्यंत फॉर्मात असलेल्या सुपरनोव्हाच्या जेमिमा रॉड्रीगेझला २२ धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर सुपरनोव्हाची कर्णधार हरमनप्रीत कौरने दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
महिला आयपीएलच्या अंतिम फेरीत व्हेलोसिटी संघाने सुपरनोव्हापुढे १२२ धावांचे आव्हान आव्हान ठेवले आहे. सुपरनोव्हा संघाने नाणेफेक जिंकत व्हेलोसिटी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हा निर्णय योग्य असल्याचे सुपरनोव्हा संघाने दाखवून दिले. कारण सुपरनोव्हा संघाच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि त्यांनी व्हेलोसिटीच्या पाच फलंदाजांना ३७ धावांमघ्ये माघारी धाडले. पण त्यानंतर सुष्मा वर्मा आणि अमेलिया केर यांनी सहाव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.
सुष्माने यावेळी ३२ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ४० धावांची खेळी साकारली होती. सुष्माला केरने सुयोग्य साथ देत चार चौकारांच्या जोरावर ३६ धावा केल्या. या दोघांच्या धावांच्या जोरावर व्हेलोसिटी संघाला १२१ धावा करता आल्या.