जयपूर, महिला आयपीएल 2019 : मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जच्या वादळी खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने महिला आयपीएल स्पर्धेत गुरुवारी व्हेलॉसिटी संघाविरुद्ध 3 बाद 142 धावा उभ्या केल्या. जेमिमाने नाबाद 77 धावांची खेळी केली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यात व्हेलॉसिटीला अपयश आले. सुपरनोव्हाजने हा सामना 12 धावांनी जिंकला. व्हेलॉसिटीने नेट रन रेटच्या जोरावर अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. त्यामुळे ट्रेलब्लेझर संघाला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला.
नाणेफेक जिंकून मिताली राजच्या व्हेलॉसिटी संघाने हरमनप्रीतच्या सुपरनोव्हाज संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रिया पुनिया आणि चमारी अथापट्टू यांनी सावध सुरुवात केली, परंतु पाचव्या षटकात पुनिया ( 16) माघारी परतली. शिखा पांडेने तिला बाद केले. त्यानंतर आलेल्या जेमिमाने दुसऱ्या विकेटसाठी अथापट्टूसह अर्धशतकी भागीदारी केली. अॅमेला केरने ही भागीदारी तोडली. तिने अथापट्टूला ( 31) बाद केले. जेमिमाने एका बाजूने फटकेबाजी सुरू ठेवली होती. तिने 31 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही जेमिमाचा झंझावात थांबला नाही. तीने मैदानी फटक्यांवर भर देताना चौकारांची रांग लावली. जेमिमाने 48 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 77 धावा केल्या.
प्रत्युत्तरात व्हेलॉसिटी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांच्या दोन्ही सलामीच्या खेळाडू 21 धावांवर माघारी परतल्या. डॅनियल व्हॅट आणि मिताली राज यांनी अर्धशतकी भागीदारी केली. व्हॅटचा 43 धावांचा झंझावात पूनम यादवने रोखला. त्यानंतर मिताली आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी संघर्ष केला, परंतु त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले. मितालीने 42 चेंडूंत 40*, तर कृष्णमूर्तीने 29 चेंडूत 30* धावा केल्या. व्हेलॉसिटीला 3 बाद 130 धावाच करता आल्या.
Web Title: WIPL2019: Supernovas final; Despite losing, they will play for the Velocity title
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.