नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे आगामी वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. मात्र भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. अशा स्थितीत बुमराहच्या जागेवर कोणाला संधी मिळणार याची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. यावरून भन्नाट मीम्स देखील व्हायरल होत आहेत. तर काही चाहत्यांनी बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून बॉबी देओलला पसंती दिली आहे.
बॉबी देओल होऊ शकतो बुमराहची रिप्लेसमेंटबॉबी देओल गोलंदाजी करत असल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ट्विटर युजर @whoshud ने हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, "मला माहित आहे की बुमराहची जागा कोण घेऊ शकते." त्याच्या या ट्विटवर लाईकचा वर्षाव होत आहे. तसेच अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही युजर्स म्हणत आहेत की भगवान बॉबी हा बुमराहचा परफेक्ट रिप्लेसमेंट असू शकतो. तर काहींनी गंमतीने लिहिले की, समोरचा संघ आधीच भीतीने कापू लागला आहे.
जसप्रीत बुमराह सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेतून देखील बाहेर झाला आहे. खरं तर बुमराह मागील मोठ्या कालावधीपासून दुखापतीच्या कारणास्तव संघाबाहेर राहिला आहे. आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आले आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील एक सामना झाला असून भारताने विजयी सलामी दिली आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची असणार आहे. बीसीसीआयने या दोन टी-20 मालिका आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी जसप्रीत बुमराहला संघात स्थान दिले होते.