KBC 2023 : 'कौन बनेगा करोडपती' हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. दिग्गज अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांच्या या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. शोचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे देखील 'कौन बनेगा करोडपती'ने प्रेक्षकांच्या मनात जागा केली. सामान्य लोकांना प्रसिद्धी आणि असामान्य जागी घेऊन जाणारं हे व्यासपीठ नेहमी चर्चेत असते. विविध क्षेत्राशी निगडीत प्रश्न विचारून बीग बी स्पर्धकांना आकर्षित करत असतात. एका एपिसोडदरम्यान शोमध्ये क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने कोणत्या संघासोबत आयपीएलचा पहिला किताब जिंकला होता? असा प्रश्न विचारण्यात आला.
दरम्यान, रोहित संबंधित विचारलेल्या प्रश्नासाठी चार पर्याय देण्यात आले. कोलकाता नाईट रायडर्स, डेक्कन चार्जर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या संघांचा पर्यायांमध्ये समावेश होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर 'डेक्कन चार्जर्स' हे आहे. आता हा संघ जगातील सर्वात मोठ्या ट्वेंटी-२० लीगचा अर्थात आयपीएलचा भाग नाही.
खरं तर रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने तब्बल पाचवेळा मुंबई इंडियन्सच्या संघाला चॅम्पियन बनवले आहे. हिटमॅन म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या रोहितला एक यशस्वी कर्णधार म्हणून देखील ओळखले जाते. तसेच रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने दोनवेळा आशिया चषकाचा किताब उंचावला आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचा हिस्सा असून मुंबईने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.