कोलकाता : स्थानिक सामन्यांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केल्यावर तुम्हाला राष्ट्रीय संघात संधी मिळत असते. पण राष्ट्रीय संघात स्थान मिळवल्यावर एकही साना न खेळवता तुम्हाला जर डच्चू दिला तर काय वाटेल... अशीच गोष्ट भारताच्या एका क्रिकेटपटूबद्दल घडली आहे. जबरदस्त कामगिरी करत त्याने भारतीय संघात स्थान पटकावले होते. पण एकही सामना न खेळवता त्याला डच्चू देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.
भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात येईल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पंत अपयशी ठरत असताना संजू सॅमसनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात संधी मिळेल, असे वाटत होते. पण एकही सामना न खेळवता त्याला संघातून बाहेर काढण्याचा निर्णय आज झालेल्या निवड समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्राच्या खेळाडूची भारतीय संघात दणक्यात एंट्रीकोलकाता : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये वनडे आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी आज भारताचा संघ जाहीर करण्यात आला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे संघात महाराष्ट्राच्या एका खेळाडूंची यावेळी एंट्री झालेली पाहायला मिळत आहे.
भारताच्या एकदिवसीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. या संघात गोलंदाजी आणि फलंदाजीतील मधल्या फळीत काही बदल करण्यात आले आहेत.
भारताची मधली फळी भक्कम असावी, यासाठी निवड समितीने महाराष्ट्रातील एका खेळाडूची निवड करण्यात आली आहे. हा खेळाडू म्हणजे महाराष्ट्राचा केदार जाधव. बऱ्याच कालावधीनंतर केदारला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
भारताच्या संघातून धोनी बाहेरच; संधी मिळणार की थेट निवृत्तीची घोषणा?कोलकाता : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि ट्वेन्टी-२० संघांची घोषणा आज करण्यात आली. या मालिकांमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुनरागमन करणार असल्याची चर्चा होती. पण या संघात धोनीला स्थान मात्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे यापुढे धोनीला संधी मिळणार की थेट निवृत्ती घ्यावी लागणार, अशा चर्चांना उत आला आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनीने एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये धोनीला आता संधी देण्यात येणार, असे म्हटले जात होते. पण निवड समितीने मात्र धोनीला यावेळी संधी दिलेली नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकांसाठी भारताचे संघ आज जाहीर करण्यात आले आहेत. या संघात भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे कमबॅक झाले आहे. पण महेंद्रसिंग धोनी आणि मयांक अगरवाल यांना या संघात स्थान मिळेल, अशी चर्चा होती. पण ही चर्चा अखेर फोल ठरल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या केदार जाधवचे या संघात पुनरागमन झाल्याचेही पाहायला मिळत आहे.
कोलकाता येथे निवड समिती, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांच्या संघ निवडीबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री दिसत नव्हते.बांगलादेश मालिकेनंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात तीन वन डे आणि तीन ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या दौऱ्याला 6 डिसेंबर पासून ट्वेंटी-20 सामन्यानं सुरुवात होणार आहे. पहिला ट्वेंटी-20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पण, मुंबई पोलिसांनी या सामन्याला सुरक्षा पुरवण्यास अडचण होईल, असे सांगितले आहे. 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि त्यामुळे मुंबईतील बहुतेक पोलीस त्या ड्युटीवर असणार आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्याला सुरक्षा पुरवण्या इतके पोलीस मुंबई पोलिसांकडे उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे.
विंडीज मालिकेचे वेळापत्रकट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - मुंबई8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - हैदराबादवन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक