नवी दिल्ली : विराटची बॅट या पर्वात अगदीच शांत आहे. तरीही आरसीबीने प्रशंसनीय मजल गाठल्याचे गौरवोद्गार इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने काढले आहेत. विराट फॉर्ममध्ये असता तर आरसीबी आणखी धोकादायक संघ बनला असता, असेही वॉन म्हणाला.
आरसीबीने आयपीएलमध्ये यंदा १२ पैकी सात सामने जिंकले. गुणतालिकेत हा संघ चौथ्या स्थानावर आहे. क्रिकबजशी बोलताना वॉन म्हणाला, ‘आरसीबीचे खेळाडू यंदा चांगले खेळत आहेत. काही सामने त्यांच्यासाठी वाईट ठरले, तरीही जे चौथे स्थान मिळाले ते विराटच्या कामगिरीविना. कोहलीची सरासरी यंदा २० च्या खाली राहिली. विराट फॉर्ममध्ये आल्यास फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलसह हा संघ आणखी धोकादायक बनेल.
चेन्नईच्या सर्वांत छोट्या धावसंख्या
गुरुवारी झालेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा संघ केवळ ९७ धावांमध्ये गारद झाला. ही चेन्नईची आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत छोटी धावसंख्या ठरली. याआधी ते २०१३ साली ७९ धावांतच धारातीर्थी पडले होते. विशेष म्हणजे दोन्हीवेळा प्रतिस्पर्धी संघ मुंबई होता. हे दोन सामने सोडले, तर चेन्नईचा संघ १००च्या आत कधीही गारद झाला नाही. एक नजर सीएसकेने आतापर्यंत उभारलेल्या सर्वांत छोट्या लक्ष्यांवर...
Web Title: Without Kohli's contribution, RCB's win is commendable: Vaughan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.