West Indies vs Pakistan 1st Test : लॉर्ड्सवर टीम इंडिया यजमान इंग्लंडचा सामना करत असताना दुसरीकडे किंग्स्टन येथे शेजारी पाकिस्तानने गुडघे टेकलेले पाहायला मिळाले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानला दोन्ही डावांत २१७ हून अधिक धावा करताच आल्या नाही. विंडीजच्या २० वर्षीय गोलंदाज जयडेन सिल्स ( Jayden Seales ) याच्यासमोर पाकिस्तानच्या दिग्गजांनी हार मानली. विंडीजकडून कसोटीत पाच विकेट्स घेणारा तो सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे. आता विंडीजला दीड दिवसांच्या खेळात विजयासाठी फक्त १६८ धावाच करायच्या आहेत.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा पहिला डाव २१७ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात विंडीजनं २५३ धावा करून नाममात्र आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पाकिस्तान जबरदस्त कमबॅक करेल असे वाटत होते. पण, घडले भलतेच. अबिद अली ( ३०), कर्णधार बाबर आझम ( ५५) आणि मोह्म्मद रिझवान ( ३०) यांनी संघर्ष केला. जयडेननं १५.४ षटकांत ५५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. केमार रोचनं ३ विकेट्स घेत त्याला उत्तम साथ दिली. पाकिस्तानचा दुसरा डाव २०३ धावांवर गडगडला.
चौथ्या डावात २०० किंवा त्यापेक्षा कमी लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजनं ६१ पैकी ५५ सामने जिंकले आहेत, तर ६ सामने अनिर्णीत राखले आहेत.
Web Title: WIvPAK : West Indies need 168 to beat Pakistan, Jayden Seales youngest bowler from WI to take five-wicket haul in Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.