Shahid Afridi on Mohmmad Rizwan-Suryakumar Yadav comparison - ICC ट्वेंटी-२० क्रमवारीत नंबर १ खेळाडू, कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज, कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज... असे अनेक विक्रम सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नोंदवले आहेत. त्याच्या बॅटीचा तडाखा जवळपास सर्वच गोलंदाजांना बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा Mr 360 अशी ओळख आता सूर्याने बनवली आहे.
सूर्यकुमार यादवने मुंबईतूनच सुरू केलेली वर्ल्ड कपची तयारी; समोर आली इंटरेस्टींग स्टोरी
सूर्यकुमारने नुकतेच आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावताना पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला खाली खेचले. रिझवाननंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त कॅलेंडर वर्षात १०००+ धावा करणारा सूर्या हा जगातला दुसरा फलंदाज ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही सूर्याने मधल्या फळीचा भार आपल्या खांद्यावर उचलला आहे आणि त्याना १९४+च्या स्ट्राईक रेटने ५ सामन्यांत २२५ धावा चोपल्या आहेत. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहली ( २४६) व मॅक्स ओ'डाऊड ( २४२) यांच्यानंतर सूर्याचाच नंबर येतो. पण, रिझवानला पाच सामन्यांत केवळ १०३ धावाच करता आल्या आहेत.
द्रविड, कोहली, रोहितने गोलंदाजांसाठी विमानातील बिझनेस सीटचा त्याग केला; कारण वाचून
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही सूर्याच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या २५ चेंडूंत नाबाद ६१ धावांच्या खेळीचे कौतुक केले आहे, परंतु त्याचवेली त्याने रिझवानचे कान टोचले. रिझवानने भारतीय फलंदाजाप्रमाणे फटक्यांमध्ये वैविधता आणायला हवी, असे मत आफ्रिदीने व्यक्त केले. Samaa TV चॅनेलला आफ्रिदीला रिझवान व सूर्या यांच्यातल्या तुलनेबाबत विचारण्यात आले.
त्यावर तो म्हणाला,''सूर्यकुमार यादव २००-२५० स्थानिक क्रिकेट सामने खेळून भारतीय संघात आला आहे. त्याला त्याचा खेळ माहीत आहे. त्यामुळे त्याच्या खेळात वैविधता आहे. त्याने तसा सराव केला आहे. तुमच्याकडे जेवढं जास्त कौशल्य असेल, तेवढं तुम्ही चांगले खेळाडू बनाल. त्यामुळे रिझवानलाही शॉट्स डेव्हलप करावे लागतील.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"