जम्मू : दहशतवाद झुगारून काश्मिरात क्रिकेट खेळण्याची इच्छा नेपाळ आणि बांगलादेशच्या खेळाडूंनी व्यक्त केली आहे. काश्मिरातील मुलींसोबत झालेला संवाद आणि तेथील प्राकृतिक सौंदर्याची माहिती घेतल्यानंतर,‘होय आम्ही काश्मिरात क्रिकेट खेळू’ असा निर्धार या विदेशी खेळाडूंनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री चषक टी-२० लीगमध्ये सहभागी होण्यासाठी नेपाळच्या राष्टÑीय क्रिकेट संघाची कर्णधार रुबिना छेत्री येथे आली आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि राज्य क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेसाठी जे आंतरराष्टÑीय खेळाडू दाखल झाले त्यात बांगला देश आणि नेपाळच्या १२ महिल ा खेळाडूंचा समावेश आहे.
रुबिनाला जेव्हा या स्पर्धेत खेळण्याचा प्रस्ताव मिळाला तेव्हा ती घाबरली होती. पण येथे प्रत्यक्ष खेळून ती आनंदी आहे. ‘दहशतवादाचे भय झुगारून मी येथे आले. मी खेळाचा आनंद घेत आहे. पुढील लक्ष्य काश्मीरमध्ये खेळण्याचे असेल. माझा निर्णय योग्यच होता, असे रुबिनाने सांगितले. (वृत्तसंस्था)
Web Title: Women cricket to be played in Kashmir
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.