सेंच्युरियन : गेल्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सावध झालेला भारतीय महिला संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणा-या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्यास प्रयत्नशील आहे.
पहिल्या दोन टी-२० सामन्यांत अनुक्रमे सात व नऊ गडी राखून विजय मिळवणाºया भारतीय संघाने जोहान्सबर्गमध्ये तिसºया लढतीत यजमान दक्षिण आफ्रिका संघाला पुनरागमनाची संधी दिली. दक्षिण आफ्रिकेने या लढतीत पाच गडी राखून विजय मिळवताना मालिकेतील आव्हान कायम राखले.
भारताने बुधवारी विजय मिळवल्यास द. आफ्रिकेच्या एका दौºयात दोन मालिका जिंकणारा पहिला संघ ठरेल. मात्र त्याचवेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघासाठी मात्र हे सोपे नाही. भारतीय पुरुष संघ याच मैदानावर या लढतीनंतर दुसरा सामना खेळणार असल्याने महिला संघ सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील राहील.
गेल्या लढतीत विजय मिळवल्यामुळे दक्षिण आफ्रिकाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलने ५ बळी घेतले. टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका संघातर्फे ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी : भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), मिताली, वेदा कृष्णमूर्ती, जेमीमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया, नुजहत परवीन, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रुमेली धर. दक्षिण आफ्रिका : डेन वॅन नीरेकर (कर्णधार), मॅरिजेन कॅप, त्रिशा चेट्टी, शबनीम इस्माईल, अयाबाँगा खाका, मासाबाटा क्लास, सुने ल्यूस, ओडिने कर्स्टन, मिग्नन डु प्रीज, लिजÞेल ली, चोले ट्रायन, नादिन डी क्लर्क, रेसीबे नटोजÞाखे, मोसेलेन डेनियल.
सामना : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० पासून
Web Title: Women look forward to winning the series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.